मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना महापुरुषांची, गड किल्ल्यांची नावे दिल्यास होणार कारवाई

BMC|Marathi Language: विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, दुकाने यांचे नामफलक आता मराठीत करण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला आहे.
Wine shops
Wine shopsSarkarnama

मुंबई : मुंबई महापलिकेतील (BMC) विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, दुकाने यांचे नामफलक आता मराठीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ज्या दुकानांमधून मद्य (Wine shops) पुरविले जाते अथवा विक्री केली जाते, अशा दुकानांच्या नामफलकावर महापुरुषांची अथवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत, असे आदेश मुंबई पालिका प्रशासनाने दिले आहे. मराठी भाषेचा वापर अधिक प्रमाणात व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Wine shops
मोदी सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतेय; शिवसेना खासदार बारणेंचा आरोप

मुंबई पालिकेच्या हद्दीतील दुकाने आणि आस्थापना यांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी म्हणजे सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्या भाषेत देखील नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या अक्षरातच असले पाहिजे. एवढेच नव्हे तर ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विक्री केली जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत. या नियमांचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असे आदेश पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

Wine shops
निवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसला पहिला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्रीच भाजपच्या वाटेवर

महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४, १७ मार्च २०२२’अन्वये 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (सुधारणा) अधिनियम, २०२२' प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे कलम ३६ क (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे. परंतु, अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com