बंडखोरांच्या पलायनाची माहिती आधी का मिळाली नाही? गृहखातं अॅक्शन मोडवर

Maharashtra Political crises| एका रात्रीत एवढे सगळे आमदार बाहेर जातात आणि महाराष्ट्र पोलिसांना, गृह विभागाला याची साधी खबरही लागत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
  Home minister Dilip Walse patil| Commissioner of Police Sanjay Pandey
Home minister Dilip Walse patil| Commissioner of Police Sanjay Pandey

मुंबई : महाविकास आघाडीतील बंडखोर आमदारांच्या बंडाचा फटका आता त्यांच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त संजय पांडे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. (Eknath Shinde latest news update)

राज्यातील जवळपास चाळीस आमदार आणि काही मंत्री (Eknath Shinde) अर्ध्या रात्रीत महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातला जातात. गुजरात पोलिसांच्या बंदोबस्तात ते गुवाहाटीपर्यंत पोहोचतात. एका रात्रीत एवढे सगळे आमदार बाहेर जातात आणि महाराष्ट्र पोलिसांना, गृह विभागाला याची साधी खबरही लागत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या गृहखात्याने गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या सर्व आमदार, मंत्री, खासदार यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकांनी कोणतीही माहिती गृहखात्याला न दिल्याने या सर्वांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या सुरक्षेत तैनात असेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  Home minister Dilip Walse patil| Commissioner of Police Sanjay Pandey
एरंडोल शिवसेनेत ३२ वर्षानंतर बंडखोरीची पुनरावृत्ती

विधान परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा एका जागेवर पराभाव झाला. तर भाजपच्या पाचही जागा निवडून आल्या. या सर्व घडामोडी होत असताना त्याच रात्री एकनाथ शिंदे काही आमदारांचा ताफा घेऊन राज्याच्या बाहेर पडले. यात फक्त आमदारच नाही. तर कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचाही समावेश होता. मग एवढ्या मोठ्या हालचाली घडत असताना सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना कल्पना का दिली नाही आणि गुप्तचर विभागालाही याची माहिती कशी लागली नाही?, अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही व्यक्त केली होती.

त्यानंतर मंगळवारी पहाटे एवढे मोठे बंड झाल्याची बातमी समोर आली. काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त संजय पांडे यांंच्यासोबत तातडीची बैठक घेत या कॅबिनेट मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, एकनाथ शिंदे सुरतच्या दिशेने जात असल्याची माहिती त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी कंट्रोल रूमला दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इतर चार मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनाही याबाबत वाॅकीटाॅकीवर माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणावर कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in