लालपरी सेवेत हजर; पण १६ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार?

ST Strike| Supreme Court| ST strike news update| उच्च न्यायालयाने निर्णय देताना सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना सेवत हजर राहण्यासाठी २२ एप्रिल २०२२ ही मुदत दिली होती
 ST strike news update
ST strike news update

मुंबई : एसटी विलीनीकरणाच्या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी (msrtc news) गेल्या सहा महिन्यांपासून एसटी (ST Strike) कर्मचारी आंदोलन करत होते. मात्र न्यायालयाच्या (court) निर्णयानंतर आणि वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अटकेनंतर राज्यभरातील एसटी कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे सामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी पुन्हा एकदा रस्त्यांवर धावू लागली आहे. मात्र संपकाळात बडतर्फ कर्मचाऱ्यांवर अजूनही कारवाईची टांगती तलवार आहे. (St Strike latest news update)

एसटी सपांआधी एसटीच्या सेवेत एकूण ९२हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत होते. मात्र संपकाळात हजारो कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. आता संप मिटल्यानंतर एसटीच्या पटावरील एकूण ८२ हजार २०० कर्मचाऱ्यांपैकी ७६ हजार ९०० कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर परतले आहेत. पण अद्यापही ११ हजार कर्मचारी बडतर्फ आहेत.

संपावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना सेवत हजर राहण्यासाठी २२ एप्रिल २०२२ ही मुदत दिली होती. या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. असे असतानाही अद्याप १६ हजार एसटी संपकरी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. यातील ११ हजार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहेत. आज शेवटचा दिवस असल्याने त्यांच्यावरील बडतर्फीची कारवाई कायम राहणार की त्यांना मुदतवाढ मिळणार, यावर आज निर्णय अपेक्षित आहे.

दरम्यान, सहा महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यात एसटीच्या फेऱ्या पुर्ववत झाल्या आहेत. संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल झाले पण लालपरी पुन्हा धावु लागल्यानंतर आता ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा आधार मिळू लागला आहे. बुधवारी (२० एप्रिल) महामंडळाने राज्याभरात २९ हजार फेऱ्या झाल्या. यातून १७.७८ लाख प्रवाशांची वाहतूक केली. या एका दिवसात ११ कोटींचे उत्पन्नही मिळाले, अशी माहिती महामंडळाने दिली.

खास बाब म्हणजे कर्मचारी कामावर येत असल्याने लालपरीची सेवा सेवा पूर्वपदावर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तसेच, एसटी महामंडळातील पाच हजारांहून अधिक बसची सध्या भंगारसदृश्य झाल्याने आता एसटी महामंडळ प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेणार आहे. बेस्टच्या धर्तीवर एसटी महामंडळ करारानुसार खासगी बस भाडेतत्त्वावर चालवणार आहे. या बसेसला ४७ रुपये प्रतिकिमी असा मोबदला महामंडळकडून दिला जाणार आहे.

लातूर, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या विभागात खासगी गाड्यांसाठी 'मे. साई गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स'शी करार केला जाणार आहे. त्यांच्याकडून ५०० गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार असून ३२० गाड्यांपैकी २२० गाड्यांचे कंत्राट 'साई गणेश ट्रॅव्हल्स'ला देण्यात आले. १८० गाड्यांसाठीही ही ट्रॅव्हल कंपनी प्रयत्नात आहे. लातूर, धुळे, कोल्हापूर व रायगड/ रत्नागिरी विभागांमध्ये साध्या बसची संख्या कमी असल्याने या भागातील अन्य फेऱ्यां वाढवण्याची मागणी केली जात आहे. ८ जुलै २०२१ रोजी झालेल्या महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५०० साध्या बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने मांडला होता. यासाठी ऑक्टोबर २०२१मध्ये वाहतूक विभागाने निविदा काढल्या. १२ मार्च २०२२ रोजी ४४ ते ४७ रुपये प्रति किलोमीटर दराने या बस घेण्यास संचालक मंडळाने मान्यताही दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com