Jayant Patil Big Announcement : जयंत पाटलांची मोठी घोषणा; अजित पवारांसह शपथ घेतलेल्या मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई होणार...

Ncp Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ सदस्यांनी पक्षाच्या हिताच्या विरोधी जाऊन राजभवनात शपथ घेतली आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

Mumbai : राज्याच्या राजकारणात रविवारी (दि.२) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड करत ते शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अचानक झालेल्या त्यांच्या शपथविधीने सर्वांना धक्का दिला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथ घेतलेल्या आमदारांबाबत मोठी कारवाई केली आहे. शपथ घेतलेल्या अपात्र ठरविण्याबाबतची मागणीचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे मेलद्वारे पाठवल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे

जयंत पाटील(Jayant Patil) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ सदस्यांनी पक्षाच्या हिताच्या विरोधी जाऊन राजभवनात शपथ घेतली आहे. आणि त्यांची कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि ती कृती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवून केली आहे. म्हणून ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

Jayant Patil
Maharashtra Politics: अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; 'संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो...'

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)कडून शपथ घेतलेल्या आमदारांना अपात्र करण्याबाबत कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेली आहे. व्हाट्सअप आणि ईमेल आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेली आहे. आमची अपेक्षा आहे ते लवकरात लवकर आम्हांला प्रतिसाद देतील. तसेच आम्ही निवडणूक आयोगाला देखील या घटनेची माहिती दिली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले; आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ जण म्हणजे पक्ष नव्हे. त्यामुळे या नऊ जणांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षविरोधात कारवाई केल्याने या नऊ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच जनमत हे पवार साहेबांच्या सोबत आहे. येत्या 5 जुलै रोजी शरद पवारा(Sharad Pawar)साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्र कसा उभा राहतो ते देखील पाहा असंही पाटील म्हणाले. यातील अनेक आमदार हे परत येणार आहेत. त्यांना आपल्या मतदारांना तोंड कसं दाखवायचं असा प्रश्न पडला आहे. त्यांना या गोष्टीही माहिती नव्हत्या. जे परत येतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, पण जे परत येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.

Jayant Patil
Maharashtra Politics: नव्या राजकीय भूकंपामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची झाली गोची; कट्टर शत्रू होणार मित्र?

'संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो...'

त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. या सर्व घडामोडींवर शरद पवार यांनीही यावर भाष्य केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषद घेत आपलं मत माडलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असं पवार साहेबांना विचारलं. त्यावर त्यांचं उत्तर ऐकून मला असं वाटतं की साताऱ्याची सभा आणि पवार साहेबांचं आजचं उत्तर हे कुणालाही उर्जा देणारं आहे. माझ्या स्वतःसाठी सुद्धा हे प्रेरणा देणारं आहे. संघर्ष कसा करायचा हे शरद पवार यांना माहित आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो त्यामधून ना उमेद व्हायचं की पुन्हा उभा राहयचं हे ठरवायचं असतं", असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com