'अकलेचे किळसवाणे प्रदर्शन करायचे हीच शिवसेनेची लायकी'- अतुल भातखळकर

पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.
Atul Bhatkhalkar- Priyanka Chaturvedi, Latest political news in maharashtra
Atul Bhatkhalkar- Priyanka Chaturvedi, Latest political news in maharashtraSarkarnama

मुंबई : 'अपुऱ्या माहितीवर आधारित आंतरराष्ट्रीय विषयांवर ट्विट करत आपल्या नसलेल्या अकलेचे किळसवाणे प्रदर्शन करायचे आणि सोशल मीडियावर आपले तोंड फोडून घ्यायचे. आणि वर याला शिवसेनेची मर्दानगी, गनिमी कावा, समजायचे. हीच तुमची लायकी हीच तुमची औकात.'' अशा शब्दांत भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यावर टीकेचा आसूड ओढला आहे. (Latest political news update)

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांच्यात जोरदार वादावादी झाली. अॅडम यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला. यानंतर प्रियंका यांनी आपला दावा सिद्ध करण्यासाठी काही पुरावेही दिले. पण हा वाद वाढला आणि त्यानंतर अॅडम यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना फोनवर बोलण्याची विनंती केली. पण त्यांनी ती मान्य केली नाही.

Atul Bhatkhalkar- Priyanka Chaturvedi, Latest political news in maharashtra
संभाजी भिडेंची जीभ घसरली; डॉक्टर हरामखोर...

युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर तेथे राहणारे लोक आपला जीव वाचवण्यासाठी पोलंडला पळून जात आहेत. यामध्ये काही भारतीय लोकांचाही समावेश आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारतीय नागरिकांना पोलंडच्या सीमेत प्रवेश करण्यापासून रोखले जात असल्याचा दावा एका व्हिडीओत करण्यात आला आहे. यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करून या प्रकरणाची माहिती दिली.

त्यांनी पोलंडमधील भारतीय दूतावासाला टॅग करून भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये प्रवेश मिळत नसल्याचे लिहिले. काही जणांना एक दिवस आधी प्रवेश देण्यात आला. नंतर त्यांना परत पाठवण्यात आले. आता भारतात राहणाऱ्या त्याच्या पालकांना त्याच्या सुरक्षेची चिंता आहे. प्रियांका यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आणि ऑपरेशन गंगा यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले.

पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांनी प्रियांकाच्या ट्विटला उत्तर दिले. ते म्हणाले की, हे पूर्णपणे चुकीचे आहे. पोलिश सरकार कोणालाही आपल्या देशाच्या सीमेत प्रवेश करण्यापासून रोखत नाही. अॅडमने प्रियांका यांना त्यांना मिळालेली माहिती पडताळून पाहण्यास सांगितले. तसेच. कृपया खोट्या बातम्या (Fake news) पसरवू नका, असा आरोपही केला. यावर संतापलेल्या प्रियंका यांनी पोलंडच्या सीमेवर अडकलेल्या सात विद्यार्थ्यांची नावे आणि नंबर शेअर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com