सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

Cyrus Mistry : ते गुजरातवरून पालघरच्या दिशेने येत होते.
Cyrus Mistry Passes Away News
Cyrus Mistry Passes Away News Sarkarnama

Cyrus Mistry Passes Away News : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते गुजरातवरून मुंबईच्या दिशेने येत असतांना चोरोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघाच झाला आहे. याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून याबाबतची अधिकृत माहिती पालघर पोलिस अधिक्षकांनी दिली आहे. (Cyrus Mistry Passes Away News Latest News)

Cyrus Mistry Passes Away News
शिल्लक सेनेच्या दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?

सायरस मिस्त्री हे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येत होते. ते पालघरमधील डहाणू तालूक्यातील चारोटी या गावातील चारोटी नाक्यावर त्यांची चारचाकी दुभाजकाला धडकली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पल्लोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. त्यांची 2019 साली सायरस मिस्त्री यांनी टाचा समूहाच्या प्रमुखपाची सुत्रे सांभाळली होती. मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुंटुंबात झाला होता. पल्लोनजी मिस्त्रींचे ते धाकटे सुपूत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांच शिक्षण झाल तर लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण झालं केले होते.

Cyrus Mistry Passes Away News
भारतीय गरोदर महिलेचा मृत्यू; पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्याने दिला राजीनामा

दरम्यान, 2006 साली मिस्त्री टाटा समुहाचे सदस्य बनले होते. तर 2013 साली वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते. मात्र, 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना टाटाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. त्यांच्यावर नुकसानीमध्ये चाललेल्या परदेशी कंपन्यांमध्ये भागिदारी विकल्याचा मिस्त्रींवर आरोप होता. टाटा समुहामधील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. मिस्त्री यांनी शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर पद देखील भूषवले होते. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांसह जखमींना टाटा समुहाकडून मदत मिळवून देण्यात सारयस यांचा मोठा वाटा होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com