ACB News : ठेकेदाराकडे 20 हजाराची लाच मागणाऱ्या सरपंच ACB च्या ताब्यात

ACB News : . दत्ता धावडे यालाही ताब्यात घेतले आहे.
File Photo Of Bribe
File Photo Of BribeSarkarnama

ACB News : ठेकेदाराकडून वीस हजारांची मागणी करणाऱ्या महिला सरपंचाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. निंबळक (जि, नगर) येथे हा प्रकार घडला आहे.

निंबळकच्या सरपंच प्रियांका अजय लामखडे (वय 35) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचा लिपिक दत्ता वसंत धावडे (वय 40) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता धावडे यालाही ताब्यात घेतले आहे. येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.

याबाबतची तक्रार ठेकेदार यांनी येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती. या तक्रारीचे अनुषंगाने मंगळवारी निंबळक येथे लाच पडताळणी केली असता सरपंच प्रियंका लामखडे व लिपिक दत्ता धावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपयाची मागणी करून सदर रक्कम सरपंच लामखडे यांनी लिपिक धावडे याच्याकडे देण्यास सांगितले. रक्कम मिळाल्यानंतरच तक्रारदार यांचे बिलाचे चेक वर सही करेन, असे सरपंच लामखडे यांनी सांगितल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले आहे.

File Photo Of Bribe
Hasan Mushrif ED Raid : छापेमारीनंतर हसन मुश्रीफांचा एकच सवाल ; म्हणाले,'पुन्हा कशासाठी.."

निंबळक गावातील निंबळक-लिंगतीर्थ रस्त्याचे मजबुती करण्याचे कामाचा ठेका जिल्हा परिषदेकडून सोनेवाडी (ता. नगर) येथील ठेकेदाराला मिळाला होता. या ठेकेदाराने संबधीत रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करून केलेल्या कामाचे बील 13 लाख 65 हजार 56 रूपये मंजुरीसाठी जिल्हा परिषदमध्ये सादर केले होते. हे बिल मंजूर होऊन ग्रामपंचायत निंबळक यांचे बँक खात्यामध्ये जमा झाले होते. ठेकेदार यांना 12 लाख 38 हजार 556 रूपयांचा चेक सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहीचा मिळाला होता.

File Photo Of Bribe
Bachchu Kadu accident news : आमदार बच्चू कडू यांचा अपघात ; डोक्याला गंभीर दुखापत

ठेकेदार यांच्या बिलातील एक लाख 26 हजार रूपये रक्कम ‘जीएसटी’ पोटी ग्रामपंचायतने राखून ठेवली होती. तक्रारदार यांनी ‘जीएसटी’ पुर्तता करून एक लाख 26 हजार रूपये रकमेचा चेकची ग्रामपंचायत निंबळक, ग्रामसेविका यांच्याकडे मागणी केली होती, ग्रामसेविका यांनी चेकवर सही करून चेक तयार ठेवला होता. परंतु या चेकवर सही करण्यासाठी सरपंच प्रियंका लामखडे यांनी ठेकेदाराकडे 20 हजार रूपयांची मागणी केली होती, यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून सरपंचांना ताब्यात घेतलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com