भडकावू भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई का नाही ; अबू आझमींचे गृहमंत्र्यांना पत्र

राज ठाकरे हे अजाणबाबत भाष्य करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत
भडकावू भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई का नाही ; अबू आझमींचे गृहमंत्र्यांना पत्र
raj thackeray, dilip walse patil,abu azmisarkarnama

मुंबई :राज्यात भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) असे चित्र आहे. मनसेने (mns) जिथे भोंगा वाजेल तिथे हनुमान चालीसा असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकाने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. पण या बैठकीला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पाठ फिरवली.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (abu azmi) यांनी आता या वादात उडी घेतली आहे. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात अबू आझमी यांनी राज ठाकरेच्या भूमिकेला विरोध केला आहे. राज ठाकरेंवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी गृहमंत्र्यांना विचारला आहे. 'राज्यात कायद्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे का?' असे अबू आझमींनी या पत्रातून विचारले आहे.

raj thackeray, dilip walse patil,abu azmi
हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का ?

सध्या देशभरासह राज्यातही धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण झाले आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी मोक्कासारखा कठोरात कठोर कायदा बनवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे अजाणबाबत भाष्य करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. राज ठाकरे भडकावू भाषण करत असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही?,

राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे एक मे रोजी जाहीर सभा घेणार आहेत. त्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, 'कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. जर सरकारच्या चुका कुणीतरी मांडत असेल आणि त्याला रोखले जात असेल, तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. राज ठाकरे सभा यांच्या सभेला परवानगी मिळो अथवा ना मिळो राज ठाकरे सभा घेणारच,'

raj thackeray, dilip walse patil,abu azmi
मुंबईत जे घडतयं ते मुख्यमंत्र्यांच्याच इशाऱ्यावर ; फडणवीसांचा हल्लाबोल

राज ठाकरे यांच्या सभेची जागा बदलणार या ही अफवा शहरात पसरल्या नंतर मनसेच्या वतीने पत्रकार परिषद घेत कुठला ही दबाव आला तरी कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरे यांची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच घेणार असल्याचं मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.