राजकारण तापलं! हनुमान चालिसा लावणाऱ्यांना अबु आझामींचा थेट इशारा, धमक्या देऊ नका...

Abu Azmi|Raj Thackeray| प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, यासारखी कोणती चांगली गोष्ट असू शकत नाही.
राजकारण तापलं! हनुमान चालिसा लावणाऱ्यांना अबु आझामींचा थेट इशारा, धमक्या देऊ नका...
Abu Azmi|Raj Thackeray

Abu Azmi warned Raj Thackeray

मुंबई : आम्हाला रोज धमक्या देऊ नका, आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत, राजकारणासाठी इतक्या खालच्या थराला जाऊ नका, अशी प्रतिक्रीया समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी (Abu Azmi) यांनी दिली आहे.माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनसेला थेट इशाराच दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंग्यामुळे राजकारण पेटलं आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याची भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. यावरच अबु आझमी यांनी निशाणा साधला आहे.

Abu Azmi|Raj Thackeray
जॅकलिन फर्नांडिस अडचणीत! परदेशात जाण्यासाठी घेतली उच्च न्यायालयात धाव

काय म्हणाले अबु आझमी?

नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा वाचण्याची भूमिका घेतली, घ्या ना, पण तुम्ही मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाचणार असाल तर त्याला विरोध होणारच, अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच. तुम्ही हनुमान चालिसा वाचणार ही खुप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, यासारखी कोणती चांगली गोष्ट असू शकत नाही. आम्ही तर म्हणतो एखाद्या मंदीरासमोर जर तुम्ही हनुमान चालिसा वाचणार असाल, त्यांना पाणी, ज्युस, सरबताची गरज असेल तर ते तर आम्ही मुस्लिम लोक स्वत: देऊ. पण जर तुम्ही आमच्या मशिदींसमोर हनुमान चालिसा वाचणार असाल आणि दुप्पट आवाजात वाचणार असाल तर आम्ही काही बांगड्या घालून बसलो नाहीत. समजलं तुम्हाला, आम्हाला रोज चॅंलेज करु नका, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नका. कुठे चुकीचं होत असेल तर पोलिसांकडे जा, तक्रार करा, पण जास्त वाढवण्याचा प्रयत्न केलात तर अॅक्शन ला रिअॅक्शन मिळणारच, मग बघु जे होईल ते होईल, असा इशाराच अबु आझमी यांनी दिला आहे.

पण राज ठाकरे यांनी हा मुद्दा सामाजिक मुद्दा असल्याचं म्हटलं आहे, असे विचारले असता अबु आझमी म्हणाले, ही त्यांची दिवाळखोरी आहे. त्यांचं राजकीय करियर संपलं आहे. ते कधी झेंड्यात हिरवा रंग लावतात,तर कधी झेंडाचं बदलतात, कधी मराठी उत्तर भारतीयांचा मुद्दा उपस्थित करतात, तर कधी हिंदी उत्तर भारतीय लढाई करतात, हे फक्त राजकारणात स्वत: चे स्थान शोधण्यासाठी हे सर्व करत आहेत. महाराष्ट्राराची जनता त्यांना कधीही स्विकारणार नाही. हे सर्व द्वेष पसरवण्यासाठी ते करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

आज देशाची अवस्था काय झाली आहे ते पहा. तिकडे श्रीलंका दिवाळखोरीत निघाली आहे. भारतीयांनी या गोष्टी सोडल्या नाहीत तर भारतही दिवाळखोरीत जाईल, अशी भाकिते आता भारतीय अर्थतज्ज्ञ करत आहेत, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.