Abu Azmi
Abu Azmisarkarnama

'उत्तर भारतीयांना घाबरून राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केला!'

अबू आझमी (Abu Azmi) यांची राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका

पिंपरी : आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन ते अडचणीत सापडतील म्हणून आपण अयोध्या दौरा रद्द केल्याचे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत आज सकाळीच (ता.२२) सांगितले. मात्र, उत्तर भारतीयांमध्ये त्यांच्याप्रती असलेल्या व्देषामुळे त्यांच्या रागाला घाबरून राज यांनी हा दौरा रद्द केला असल्याचा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी दुपारी पिंपरीत पत्रकारपरिषदेत केला. सतत राजकीय भूमिका बदलणारे राज हे नौंटकी असल्याची सडकून टीका त्यांनी केली.

मराठीच्या मुद्यावर मराठी माणूस पाठीशी उभा न राहिल्याने राज यांनी आता हिंदुत्वाचा आधार घेतला असल्याचे आझमी म्हणाले. मशिदीसमोर लाऊडस्पिकर लावून मते मिळतील, असे त्यांना वाटतेय, या शब्दांत त्यांनी राज यांना लक्ष्य केले. अशा आंदोलनाऐवजी प्रचंड बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध ते करण्याची खरी गरज आहे, असे ते म्हणाले. विकासावर कोणीही बोलत नसून फक्त द्वेषाचे राजकारण सध्या सुरु, असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

Abu Azmi
'शिवाजी पार्कमध्ये सभा होती, त्यावेळी राज ठाकरे छत्री घेऊन उभे होते काय?'

राज हे स्वतःच्याच राजकारणावर त्रस्त आहेत. त्यांनी जे पेरले तेच उगवणार आहे. त्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. म्हणून त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितलीच पाहिजे, असे ते म्हणाले. मतांच्या राजकारणासाठी मीच खरा हिंदू असे सांगण्याची सध्या शर्यतच लागली आहे, या शब्दांत त्यांनी शिवसेना (Shivsena), मनसे, व भाजपवरही (BJP) शरसंधान केले. भ्रष्टाचार व महागाईलवरून लक्ष विचलित करण्यासाठी भोंग्याचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Abu Azmi
अयोध्या दौरा बारगळला? राज ठाकरे कडाडले पण ब्रिजभूषण सिंहांवर बरसलेच नाहीत

एअर इंडिया, बंदरे व सरकारी उपक्रम विकून म्हणजे त्यांचे खासगीकरण करून आरक्षण संपवण्यात येत असल्याचा आरोप आझमी यांनी केंद्र सरकारवर केला. रुग्णालयात औषधे मिळत नसताना पन्नास हजार कोटी रुपयांचे नवे संसद भवन हवे कशाला, अशी विचारणा करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. त्याव्दारे नवीन संविधान आणण्याचा भाजपचा कुटील डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. देशातील एकंदरीत परिस्थिती भयानक आहे, असे सांगत नागरिक जागरुक राहिले नाहीत, तर भारताचा श्रीलंका होऊ शकतो, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com