Abhijeet Bichukale On Gajanan Kale: गजानन काळेंचं नाव आजपासून 'गांजा काळे' म्हणत बिचुकलेंनी घेतला मनसेशी पंगा!

Abhijeet Bichukale : घरातून फरफरट नेवून राज ठाकरेंच्या समोर तुझं कानफाड फोडीन!
Abhijeet Bichukale : Gajanan Kale
Abhijeet Bichukale : Gajanan KaleSarkarnama

Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्याशी आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी थेट पंगा घेतला आहे. "आजपासून गजानन काळे यांचे नाव गांजा काळे म्हणत बिचुकलेंनी मनसेच्या गजानन काळेंना डिवचले आहे. यापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान काळे यांनी अभिजीत बिचुकले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. .

"सकाळी-सकाळीच राऊत टिव्हीवर बोलायला सुरूवात करतात. मला ईडीला विचारायचं लागेल यांना तुरुंगात टाकलं होतं की वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं. सकाळी-सकाळी संजय राऊत(Sanjay Raut) कडक गांजा मारून येतात. संजय राऊतांना वाटतं की तेच भगवान आहेत. एवढा आत्मविश्वास महाराष्ट्रात दोनचं माणसांमध्ये टिकून आहे. एक संजय राऊत आणि दुसरे अभिजीत बिचुकले", असे गजानन काळे म्हणाले होते.

Abhijeet Bichukale : Gajanan Kale
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत शिंदे सकारात्मक; पण राज्यसरकारमध्येच...

गजानन काळेंनी अभिजित बिचुकलेंचा उल्लेख करत संजय राऊतांवर टिका केली होती. यावरून बिचुकले यांनी पलटवार केला आहे. "माझं नाव घेणाऱ्या त्या माणसाचं नाव काय आहे. त्याला आज मी नाव देतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) आमचे बंधू आहेत. राज ठाकरे यांना सांगतो तुमचा जो कोण तो पदाधिकारी आहे. त्याचे नाव आजपासून गांजा काळे आहे. तुझ्या घरात येईन तुला फरफरटत नेईन आणि राज ठाकरे यांच्यासमोर कृष्णकुंजवर तुझं कानफाड फोडीनं. तू गांजा ओढला का?, तुझ्या रक्तात गांजा आहे का? राज ठाकरे आहेत म्हणून उड्या मारु नको," असे बिचुकले यांनी काळेंना जोरदारपणे ठणकावून सांगितले.

Abhijeet Bichukale : Gajanan Kale
Aditya Thackeray : माझे आजोबाही म्हणत असतील, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राचे अनावरण..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in