आत्तापर्यंत 'लेना बँक' पाहिल्या मात्र मुख्यमंत्री शिंदे म्हणजे 'देना बँक'

Eknath Shinde|Shivsena|Abdul Sattar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाणासमोर कुणाचाच बाण टिकणार नाही
Minister Abdul Sattar-Eknath Shinde Latest News
Minister Abdul Sattar-Eknath Shinde Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. आतापर्यंत मी लेना बँक बघितली होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे म्हणजे देना बँक आहेत, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिंदेंची स्तुती केली. आज मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात औरंगाबादमधील आमदारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. (Minister Abdul Sattar-Eknath Shinde Latest News)

Minister Abdul Sattar-Eknath Shinde Latest News
सरकार येते जाते कोणी ताम्रपट घेऊन आला नाही : अजित दादांनी पिचड समर्थकांना सुनावले

सत्तार म्हणाले की, मी मंत्री असतांना जे काम मला करता आले नाही ते कामे काही तासात शिंदे यांनी केले. इतक्या मोठ्या मनाचा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात बघितला नाही. मी याआधी काँग्रेसमध्ये असताना आमदार कमी आणि सालदार जास्त होतो. त्यावेळी अशोक चव्हाण आमचे नेते होते. मात्र, त्यांच्यापेक्षा दहा पटीने शिंदे यांनी आपल्याला मदत केली आहे.

आतापर्यंत जगात एव्हढा मोठा उठाव कुठेच झाला नसेल तो शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी केला आहे. आत्तापर्यंत लेना बॅंक बघितली मात्र शिंदे म्हणजे देना बॅंक आहेत. आधीचे मुख्यमंत्री हे विकास कामांसाठी सही करतांना कचरत होते. मात्र, शिंदे साहेब रात्री दोन वाजता जरी काम पडल तरी मदत करणारे मुख्यमंत्री आहेत. याबरोबरच आमचीच शिवसेनाच खरी असून शिंदेच्या बाणासमोर कुणाचाच बाण टिकणार नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

Minister Abdul Sattar-Eknath Shinde Latest News
Kalyan : तर त्यांनी गद्दाराची व्याख्या जाहीर करावी... विश्वनाथ भोईर

ते म्हणाले, जे काम दोन वर्षात झालं नाही ते आठ दिवसात झालं. काही जण नक्कल करतात मात्र, शिंदेंनी एक इशारा केला असता तर ते राज्यसभेत दिसलेच नसते, असा टोलाही सत्तारांनी संजय राऊतांना लगावला. शिंदे साहेबांचा आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून आदेश पाळला. त्यांनी एक इशारा केला असता तर राऊत राज्यसभेत दिसले नसते. अशी टाका त्यांनी केली. सत्तारांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदे भाषण करणार असून ते आपल्या भाषणात काय बोलतात आणि कुणाला लक्ष्य करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in