शिंदे साहेबांनी एक इशारा केला असता तर..सत्तारांनी उलगडलं राज्यसभा निवडणुकीच गुपित

Eknath Shinde|Sanjay Raut|Abdul Sattar : शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
Shivsena Leader Sanjay Raut-Mla Abdul Sattar Latest News
Shivsena Leader Sanjay Raut-Mla Abdul Sattar Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. जगातल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री होणार नाही,असे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत. मात्र, आज मिडियासमोर ज्यांना अक्कल नाही तेही येऊन नक्कल करतात आहेत. शिंदे साहेबांनी त्यावेऴी एक इशारा केला असता तर हे लोक राज्यसभेतही पोहोचू शकले नसते, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) यांना टोला लगावला. आज मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात आमदारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

Shivsena Leader Sanjay Raut-Mla Abdul Sattar Latest News
Maharashtra Politics : उदय सामंत, भुसे, देसाई अन् भूमरे यांना अजूनही मंत्रिपद सोडवेना!

शिंदे साहेबांचा आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून आदेश पाळला. मात्र, आज ज्यांना अक्कल नाही तेही मिडियासमोर येऊन नक्कल करत आहेत. शिंदे यांनी राज्यसभेच्या निवडणुकावेळी आम्हाला एक इशारा जरी केला असता तर हे लोक आज राज्यसभेत दिसली नसती, असा टोला सत्तारांनी राऊतांना लगावला. ते पुढे म्हणाले की, आम्ही इमानदार राहिलो आणि शिवसेनेच्या राज्यसभेच्या आणि विधानपरिषद उमेदवारांना मतदान केले.आम्ही दगाफटका केला नाही. त्यावेळी आम्ही शिंदेंच्या आदेशाच पालन केलं असत मात्र, शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, तो बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी घेतला आहे. यामुळे आमचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे, असे सत्तांरानी यावेळी सांगितले.

मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या सत्काराचे आयोजन आज करण्यात केले होते. यावेळी सत्तारांनी आपल्या भाषणातून चांगलीच बॅटिंग केली. सत्तार म्हणाले, शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या मतदारसंघाला दोन वर्षात जे कामे झाले नाही ते काही तासात मंजुर झाले. रात्री दोन वाजता माझ्या नगपालिकेसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला. आधींच्या मुख्यमंत्र्यांना पेन चालवण्यामध्ये अडचणी होत्या मात्र, शिंदे हे आपलेच मुख्यमंत्री असल्याने काही अडचण नाही. त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही, अशी स्तुती सत्तारांनी शिंदेची केली.

Shivsena Leader Sanjay Raut-Mla Abdul Sattar Latest News
नगरसेवक, जिल्हाप्रमुख ते थेट 'मातोश्री'ला आव्हान देणारे आमदार संतोष बांगर...

सत्तार म्हणाले, शिंदे हेच खरे शिवसेनेचे भविष्य असून त्यांच्याच खांद्यावर शिवसेनेची जबाबदारी असेल. शिवसेनेचे धनुष्यही त्यांच्याच नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळेल. शिंदेंच्या नेतृत्वाखालीच बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना पुढे जात आहे. आत्तापर्यंत लेना बँका बघितल्या पण शिंदे म्हणजे देना बँक आहेत. असे सत्तार म्हणाले.

दरम्यान राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार हे उमेदवार होतेे. मात्र, संजय पवारांना कोल्हापुरच्याच धनंजय महाडिकांकडून पराभव पत्कारावा लागला होता. मनात आणल असत तर संजय राऊतांचा पराभव करू शकलो असतो, असेच सत्तारांना आजच्या भाषणातून सांगायचे होते, असाच त्यांच्या भाषणाचा रोख होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in