MNS-Shivsena : अब राजा का बेटा राजा नही बनेगा..; मनसेला नक्की काय म्हणायचयं?

MNS- Shivsena Politics| बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार हे कोणाचीही प्रॉपर्टी नाही.
MNS- Shivsena Politics|
MNS- Shivsena Politics|

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार कोसळ्यापासून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुरुवातीच्या सत्तासंघर्षाच्या काळात मनसे (MNS) शांत होती. पण गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर मनसे अॅक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. त्यातच एका दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवर झालेली राज ठाकरे यांची मुलाखतही अजून ताजीच आहे. या मुलाखतीत राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

असे असतानाच आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ''अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा,'' असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटसोबत त्यांनी राज ठाकरे आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही शेअर केला आहे. सध्याच्या राजकीय सत्तासंघर्षाच्या दृष्टीने हा फोटो खुपच बोलका आहे.

MNS- Shivsena Politics|
धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहिल ; शिंदे गटाच्या दाव्याला अर्थ नाही ; देसाईंचे स्पष्टीकरण

या ट्विटनंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. ''बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यांचे जो पुढे घेऊन जाईल, त्यालाच जनता आता मान्य करेल. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहेत.हिंदुत्व, मराठी हा विचार कोण पुढे नेतय. ही राज्यातील जनतेची ही भावना आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार हे कोणाचीही प्रॉपर्टी नाही. व्यक्तीवर मालकी हक्क असू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फक्त प्रकाश आंबेडकर यांचाच हक्क आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

तसेच,काँग्रेस सोबत तुम्ही गेलात? हा बाळासाहेबांचा विचार आहे का? असंही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं आहे. बाळासाहेब हे सगळ्या महाराष्ट्राचे आहेत. कोणाचा काय चाललयं आहे हे, हे सगळं राज्य बघत आहे. पालिका - शिवसेना फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. मराठी पाट्या, मशिदीवरील भोंगे हे बाळासाहेबांचे विचार होते ते आता राज ठाकरे पुढे नेत आहेत, असंही देशपांडे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in