AAP ची मुंबई पालिका निवडणुकीत एन्ट्री; भाजपवर केली टीका

पालिका निवडणुकीत कुणाशीही युती करणार नाही.
BMC Election BJP & AAP Latest News
BMC Election BJP & AAP Latest News Sarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या (Local Body Election ) घडामोडी बघता लवकरच राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहे हे निश्चित झाले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकींसाठी कंबर कसली असून कामाला लागले आहेत.

दरम्यान, देशातीची आर्थीक राजधानी असलेल्या मुंबई महापालिका निवडणुक (BMC) लढवण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षानेही (AAP) केली असून मुंबईकरांसाठी सत्तेत आल्यास मोठ्या घोषणाही त्यांनी केल्या आहे. यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. (BMC Election BJP & AAP Latest Marathi News)

BMC Election BJP & AAP Latest News
नाना पटोले तोंडाची वाफ घालवण्या पलिकडे काहीही करू शकत नाहीत; दरेकरांचा टोला

दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता काबीज केलेल्या आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याने पक्षाने मुंबई महापलिकेतही निवडणुक लढवण्याचा त्यांनी निर्भार केला आहे.

पालिकेत सत्तेत आल्यास मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणाही आपकडून करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांना वीज, पाणी मोफत देणार असून पालिका निवडणुकीसाठी कुणाशीही युती करणार नाही. १० वर्षे काम करतोय, ४० हजार कार्यकर्ते आहेत. उद्यासुद्धा निवडणूका लढवायला तयार आहोत, त्याचबरोबर सर्व जागांवर निवडणूक लढवायला तयार असल्याचे आपकडून सांगण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणूका होऊ नयेत. मुंबईला मूलभूत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. सफाई, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. महाराष्ट्रात सर्व निवडणूका लढवणार आहोत, मात्र मुंबई हे आमच्यासाठी प्राधान्य राहणार आहे. भ्रष्टाचारविरोध हा आमचा अजेंडा राहील असेही सांगण्यात आले.

BMC Election BJP & AAP Latest News
विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधींनी गुजरातमध्ये टाकला हुकुमाचा एक्का

भाजप वारंवार मुंबईतील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. आता भाजप पाठोपाठ 'आप'कडूनही मुंबईतील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. मुंबईतील नालेसफाईचे दावे खोटे असल्याचा आरोप आप च्या प्रिती मेनन यांनी केला आहे. दरम्यान मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा मुंबई तुंबली तर जबाबदार अधिकारी, राजकारण्यांवर क्रिमीनल निग्लीजन्सच्या केसेस दाखल कराव्यात. भाजपनं गेल्या ५ वर्षात विरोधी पक्षाचीही जागा घेतली नाही. आता मे मध्ये मीडियासोर येऊन नालेसफाई बाबत बोलत आहेत आणि हेच भाजप इतके वर्षे शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होते, अशीही टीका मेनन यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com