
मुंबई : राज्यातील ‘ईडी’ सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेतील (BMC) प्रभाग २३६ वरून पुन्हा २२७ वर आणले आहेत. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. मतदारराजाला गृहीत धरले जात असून ही लोकशाही नसून हिटलरशाही सुरू आहे, अशी टीका आम आदमी पार्टीच्या (Aam Adami Party) मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadanvis Government) केली.
२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या संदर्भात बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, ‘‘ टाळूवराचे लोणी खाण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. महानगरपालिका निवडणुका समोर ठेऊन राज्यसरकार निर्णय घेत असून निवडणूक आयोग काम करते की नाही, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. ’’
सत्तेच्या हव्यासापोटी राज्यसरकार मनमानी कारभार करत असून वाटेल ते निर्णय घेत आहे. राज्यामध्ये वेगवेगळया पक्षाचे सरकार येईल तर सतत निर्णय बदलतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने लोकसंख्या वाढल्याचे कारण पुढे करत प्रभाग रचनेत बदल केला. आता पुन्हा २२७ प्रभाग करण्यात आले. आता लोकसंख्या कमी झाली का? असा खोचक प्रश्न प्रीती शर्मा मेनन यांनी केला.
महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मुंबईत आपची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची रचना करण्यात आली आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मुबंई वगळता पुन्हा चार सदस्सीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.मुंबईत एक सदस्सीय प्रभाग कायम ठेवण्यात आले असले तरी प्रभागांची संख्या २३६ वरून पूर्वीप्रमाणे २२७ पर्यंत खाली आणण्यात आली आहे. या विषयावरून आपकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.