'मुंबईत पावसाळ्यामध्ये दरड कोसळून बळी गेल्यास शिवसेनाच जबाबदार!'

मुंबईत (Mumbai) ३२७ दरडप्रवण क्षेत्र असून २२ हजार ४८३ कुटुंबांना पावसाळ्यात धोका असतो.
'मुंबईत पावसाळ्यामध्ये दरड कोसळून बळी गेल्यास शिवसेनाच जबाबदार!'
AAP, shivsenasarkarnama

मुंबई : मुंबईतील (Mumbai) अनेक डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांची पावसाळ्यात मृत्युशी रोजची झुंज असते. येत्या पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळण्याची घटना घडण्याची सत्ताधारी शिवसेना (Shivsena) वाट बघत आहे का? अशी टीका आम आदमीच्या पक्षाच्या (AAP) नेत्या प्रीती मेनोन शर्मा (Preeti Sharma) यांनी केली.

मुंबई हे टेकड्यांचे शहर असून पूर्वीच्या स्थायिकांनी निवास करण्याच्या उद्देशांने काही टेकड्या काळजीपूर्वक विकसित केल्या आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता टेकड्यांवर वाढलेले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सादर केलेल्या २०२१ च्या महितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार मुंबईत ३२७ दरडप्रवण क्षेत्र असून २२ हजार ४८३ कुटुंबांना पावसाळ्यात धोका असतो.

AAP, shivsena
राणांच्या अश्रूंची संसदीय समितीने घेतली दखल; राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीला बोलावणं

यावर मुंबई महानगर पालिका दावा करत आहे की, २९१ दरडप्रवण क्षेत्रे आहेत. मुंबई महानगर पालिका आपली चूक झाकण्याकरिता खोटी आकडेवारी जारी करत आहे. २०२१ मध्ये चेंबूरमधील भारत नगर आणि विक्रोळीतील सूर्यानगर येथे दरड कोसळण्याची घटनेत ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.

AAP, shivsena
'आयएएस आधिकाऱ्याच्या बदलीवर खासदार संतापल्या; म्हणाल्या दिल्लीतील कचरा इकडे नको!'

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या पूरप्रवण क्षेत्रांना सुरक्षित करण्यासाठी ६१. ४८ कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, दुर्दैवाने या लोकांच्या सुरक्षेसाठी काहीही झाले नाही, असा आरोप शर्मा यांनी केला आहे. पावसात दरडप्रवण क्षेत्रात घडणाऱ्या घटना थांबण्याकरिता कोणतीही उपययोजना मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही, असेही आपच्या नेत्यांच म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in