'वेदांता फॉक्सकॅान' प्रकल्प : ही तर फडणवीसांनी मोदींच्या आग्रहाखातर दिलेली रेवडी भेट!

AAP : मराठी माणूस जाऊदे खड्ड्यात,असे धोरण भाजप-शिंदे गटाचे आहे.
PM Narendra Modi, Devendra Fadnavis Latest Marathi News
PM Narendra Modi, Devendra Fadnavis Latest Marathi NewsSarkarnama

पुणे : 'वेदांता फॉक्सकॅान' प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघीडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. दरम्यान यामध्ये आता आम आदमी पक्षाने देखील उडी घेतली असून हा प्रकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी गुजरात निवडणुकीमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आग्रहाखातर रेवडी भेट दिल्याची टीका 'आप'चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे. (PM Narendra Modi, Devendra Fadnavis & AAP Latest Marathi News)

PM Narendra Modi, Devendra Fadnavis Latest Marathi News
भाजप, शिंदे गटाच्या वादात मनसेची उडी; खासदार श्रीकांत शिंदेंना फटकारले...

किर्दत म्हणाले की, 'वेदांता फॉक्सकॅान' प्रकल्प साधारणपणे दीड लाख कोटीची गुंतवणूक पुणे जिल्ह्यात करणार होती. मात्र अचानक हा प्रोजेक्ट गुजरातकडे गेला. यावर प्रस्थापित पक्ष एकमेकांना दोष देत आहेत. महाविकास आघाडी भाजपवर ठपका ठेवत आहे, तर भाजप-शिंदे गट हा महाविकास आघाडीला दोष देत आहे. खरे तर महाराष्ट्राने या कंपनीला बऱ्याच सवलती म्हणजे स्टॅम्प ड्युटी पासून जमीन, विज बिल आदींमध्ये घसघशीत सवलती देण्याचे ठरवले होते. मात्र अचानक गुजरातमध्ये ही कंपनी गेली आणि त्यानिमित्ताने सव्वा लाख रोजगार संधी गमावली. याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रत्यक्षामध्ये या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीस प्रथम पसंती दिली असावी असे एकूण कागदपत्रावरून वाटते. परंतु गेल्या महिनाभरामध्ये गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने जो धडाका लावला. आणि जनतेचा प्रतिसाद पाहून भाजपचे धाबे दणाणले आहे. मोदी सरकार सिसोदियांच्या मागे खोटेनाटे आरोप लावते आहे तर आरोग्य मंत्री जैन यांच्यावरही असेच आरोप करून त्यांना अटक केली आहे. यामुळे गुजरातमध्ये रोजगारावरून सामान्य जनतेमध्ये रोष आहे. याला सामोरे जाण्यासाठी मोदींना काहीतरी करून दाखवण्याची गरज होती आणि त्यामुळेच देवेंद्र फडवणीस यांनी मोदींना गुजरातसाठीची ही भेट दिली असावी, अशा शब्दात त्यांनी भाजप आणि फडणवीसांवर टीका केली आहे.

PM Narendra Modi, Devendra Fadnavis Latest Marathi News
भाजपच्या मंत्र्याची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका; शिंदे गट आक्रमक...

दरम्यान, महाराष्ट्रात या कंपनीला जरी गुंतवणूक करण्यात रस असला तरी आज भाजपला गुजरातमध्ये रोजगार निर्मितीत आलेल्या अपयशाला झाकण्यासाठी काहीतरी दाखवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची सत्ता हातात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारांचे काय व्हायचे ते होऊ दे, पण गुजरातमध्ये निवडणुकांमध्ये फायदा व्हायला हवा. निवडणूक, सत्ता अधिक महत्त्वाची, मराठी माणूस जाऊदे खड्ड्यात, असे धोरण भाजप-शिंदे गटाचे असल्याने देवेंद्र यांनी नरेंद्र यांच्या आग्रहाखातर गुजरातला दिलेली ही निवडणूक रेवडी आहे, अशा शब्दात किर्दत यांनी घणाघात केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in