'धर्मवीर'वेळी राजन विचारे अन् प्रताप सरनाईकांना डुलकी; मनसे कार्यकर्त्यांकडून फोटो व्हायरल

Rajan Vichare | Shivsena | Pratap Sarnaik : एकनाथ शिंदे आणि खासदार विचारे हे आनंद दिघे यांच्याच मार्गदर्शनात राजकारणात आले.
Rajan Vichare | Shivsena | Pratap Sarnaik
Rajan Vichare | Shivsena | Pratap SarnaikFacebook

मुंबई : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) म्हणजे ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray). कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हाप्रमुख देखील होते. आज राज्याचे नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे (Eknath Shinde) हे आनंद दिघे यांच्याच मार्गदर्शनात राजकारणात आले. दोघेही पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यामुळे ते आजही दिघे यांना गुरुस्थानी मानतात.

दरम्यान नुकताच ठाण्यातील विवियाना मॉल येथील सिनेपोलीस इथे आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर आधारित 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या चित्रपटासाठी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळाला. हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते.

Rajan Vichare | Shivsena | Pratap Sarnaik
संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार? उद्धव ठाकरेंसोबत 'वर्षा'वर खलबत; चर्चांना उधाणं

पण याचवेळी खासदार विचारे आणि आमदार सरनाईक यांना डुलकी लागल्याचा एक फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल केला जात आहे. मनसे अधिकृत महाराष्ट्र या कार्यकर्त्यांकडून चालविल्या जाणाऱ्या फेसबूक पेजवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तसेच 'धर्मवीर' चित्रपट उघड्या डोळ्यांनी पाहताना दिघे साहेबांवर प्रचंड प्रेम असलेले शिवसेनेचे महान नेते मंडळी! असे कॅप्शन देखील या फोटोंना देण्यात आले आहे.

Rajan Vichare | Shivsena | Pratap Sarnaik
ठाकरेंचे दुसरे संजयही राज्यसभेवर? शिवसेनेकडून मातोंडकर अन नार्वेकरांची चर्चा

चित्रपटामध्ये खासदार विचारे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आनंद दिघे यांचे असलेले प्रेम, माया, अशा अनेक गोष्टी दिसून येतात. तसेच विचारे आणि शिंदे यांच्यामधील मैत्र देखील चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेले आहे. त्यामुळे आनंद दिघे यांच्याच चित्रपटावेळी खासदार विचारे यांनाच डुलकी लागल्याची टीका मनसेने कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर आता खासदार राजन विचारे काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in