Aaditya Thackeray News : कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले...

Ramesh Bais Replaces Koshyari : ''...अशा व्यक्तीला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही!''
aaditya Thackeray
aaditya Thackeray Sarkarnama

Aaditya Thackeray On Resignation of Bhagat Singh Koshyari : महापुरुषांचा अवमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली होती. मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करतानाच राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आदित्य ठाकरेंनीही कोश्यारी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर एक टि्वट केलं आहे. या टि्वटमध्ये त्यांनी हा महाराष्ट्राचा विजय असल्याचं म्हटलं आहे असं म्हटलं आहे. तसेच .यावेळी त्यांनी महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाहीतले आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही अशी स्पष्ट भूमिकाही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मांडली आहे.

aaditya Thackeray
Sambhajiraje News; संभाजीराजे नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी करणार?

राज्यपालांना बदललं म्हणजे उपकार केले नाही...

राज्याच्या लोकांचा आवाज ऐकला असता तर त्यांची तात्काळ बदली केली असती. पण शेवटपर्यंत त्यांची बदली केली नाही. ही काही मेहरबानी नाही. भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला पाठीशी घातलं. याची इतिहासात नोंद राहील. तसेच राज्यपाल बदलण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा त्यांनी अवमान केला.

त्यानंतर त्यांना तात्काळ हटवायला हवं होतं. पण केंद्राने ते केलं नाही. सामुदायिक बदल्या केल्या त्यात त्यांचं नाव टाकलं. त्यामुळे कोश्यारींना बदललं म्हणजे महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर उपकार केले असं नाही अशा शब्दांत राऊतांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

aaditya Thackeray
Sanjay Raut : निवडणुक आयोग,सर्वोच्च न्यायालय यांच्या खिशात आहे काय? राऊतांचा फडणवीस,राणेंवर हल्लाबोल

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कोश्यारी यांनी राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. सुळे म्हणाल्या, उशिरा का होईना, राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. नवे येणारे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत दहा वर्षे काम केलं आहे. त्यामुळे त्यांनाही जाऊन भेटणार आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा, पण राज्यपालांनी महापुरुषांबद्दल केलेले भाष्य अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातच नाही तर देशात सुद्धा असं कधी झालेलं नाही असेही सुळे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com