Varun Sardesai : युवासेनेचा राजीनामा दिलेल्या ३५ जणांची वरुण सरदेसाईंकडून मनधरणी..

Varun Sardesai : पदाधिकाऱ्यांचे म्हणणं ऐकूण घेण्यासाठी आज वरुण सरदेसाई यांची त्यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Varun Sardesai
Varun Sardesaisarkarnama

Varun Sardesai : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्तातर झाले. त्यानंतर शिवसेनेत गळती लागली. अनेक शाखाप्रमुख, जिल्हाध्यक्ष, युवासेनेचे पदाधिकारी यांनी शिंदे गटाची वाट धरली. काही दिवसापूर्वी पुण्यातही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. ३५ युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.(Varun Sardesai latest news)

पुण्यातील युवासेनेत अंतर्गत गटबाजी व कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सांगत ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी जबाबदारी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर सोपवली आहे.

युवासेनेच्या या ३५ नाराज पदाधिकाऱ्यांचे म्हणणं ऐकूण घेण्यासाठी आज वरुण सरदेसाई यांची त्यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, या ३५ जणांची नाराजी दूर होणार का, हे लवकरत समजेल.

Varun Sardesai
Sanjay Raut : राहुल गांधींचा फोन, पण जुन्या सहकाऱ्यांनी विचारपूसही केली नाही, राऊतांचा मनसे,भाजपला टोमणा

"शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांच्या अपमानावर शांत आहेत. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे," अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजप व शिंदे गटावर केली."सामना'मधून ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असा इशाराही ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आला आहे.

"राज्यपालांनी शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचे धारिष्ट्य दाखवले. हे बळ त्यांच्यात आले ते महाराष्ट्रात एक मिंधे आणि बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ‘ब्र’ काढायला तयार नाहीत," असे ठाकरे गटानं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com