Aaditya Thackeray News :..तर मुंबईचा जोशीमठ होईल, याला जबाबदार कोण ; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Aaditya Thackeray criticise CM Shinde: त्यांनी स्वतःला विकलं, त्याप्रमाणे मुंबईला विकू नका," असा टोमणा ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
Aaditya Thackeray News
Aaditya Thackeray Newssarkarnama

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या टेंडरवर आक्षेप घेत ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका, मुंबई महापालिका (BMC)आयुक्त इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बीएमसीच्या निर्णयावर ठाकरेंनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

"पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या कामाची निविदा न काढता महापालिकेने याबाबत प्रेस नोट काढली होती. ४०० किमीच्या रस्त्याच्या प्रस्ताव मांडला कुणी मांडला ? ६ हजार कोटींचा प्रस्ताव प्रशासक मान्य कसे करतात, ही रक्कम बजेटमध्ये कशी दाखवणार, हा खर्च कुठल्या खात्यात दाखवणार आहात, कामाची डेटलाईन काय ठरली आहे," असे विविध प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

Aaditya Thackeray News
Sanjay Raut News : दावोस दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना राऊतांचं खुलं आव्हान ; 'तुमच्या नाकाखालून..'

आमच्या विकास कामावर शिंदे-फडणवीस फोटो लावतात..

"रस्त्याच्या कामाबाबत नियोजन करताना लोकप्रतिनिधींना विश्वास घेतले जात नाही, हा नगरसेवकांचा अपमान आहे. मुंबईत रस्त्यांच्या काँकिटीकरणामुळे पाणी झिरपणार नाही, त्यामुळे मुंबईचा जोशीमठ झाल्याशिवाय नाही, त्याला जबाबदार कोण," असा सवाल ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला आहे. "आम्ही केलेल्या विकासकामावर शिंदे-फडणवीस फोटो लावतात," असा टोला त्यांनी लगावला.

Aaditya Thackeray News
Chhatrapati Sambhaji Maharaj News : संभाजी महाराज धर्मवीर की धर्मरक्षक ? ; नेत्यांमध्ये रंगलयं टि्वटर वॅार

स्वतःला विकलं,मुंबईला विकू नका..

"१०० टक्के काँकिटीकरण योग्य आहे का, १ किलोमीटरसाठी १७ कोटी खर्च करणे कितपत योग्य, असे प्रश्न त्यांना यावेळी मुंबई महापालिकेला विचारला आहे," या रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री राष्ट्रीय कंत्राटदार नेमणार आहेत, पण ज्याप्रमाणे त्यांनी स्वतःला विकलं, त्याप्रमाणे मुंबईला विकू नका," असा टोमणा ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com