धक्कादायक; उपसंचालक महिला अधिकाऱ्याचा अवर सचिवांनी मंत्रालयातच केला विनयभंग

Crimw News Mumbai : तक्रार करुनही विभागाच्या मंत्र्याकडून दखल नाही
Crimw News Mumbai
Crimw News Mumbaisarkarnama

Crimw News Mumbai : मंत्रालयामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवर सचिवांच्या कार्यालयात गेलेल्या उपसंचालक महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

महिला अधिकारी कार्यालयात गेलेल्या असताना त्यांना 'मला बरे वाटत नाही मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,' असे सबंधित अधिकाऱ्याने सांगितले. अशा पद्धतीचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवानी केले आहे. त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Crimw News Mumbai
धक्कादायक; मदत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला पावणेसहा लाखाला गंडा

18 ऑक्टोबर 2022 च्या या घटनेमध्ये संबंधित महिला अधिकाऱ्यांनी स्वतःचा लेखी तक्रार अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे दिलेला आहे. तसेच त्यांच्या सचिवाना देखील दिला आहे. त्यांना त्यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने माझ्याकडे ही माहिती आली असल्याचे निलम डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच संबंधित महिला अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली असून त्यांच्याकडून सगळे ऐकून घेतले, असल्याचेही त्यांनी सांगितले.

18 ऑक्टोबरला घटना घडल्यावर ताबडतोब या महिला अधिकाऱ्यानी मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार नोंदवलेली आहे. त्या ठिकाणी अनेक कार्यालयीन कामासाठी महिला येतात. मला असे वाटते की, या दोघांची म्हणजे त्यावर अवर सचिव आहेत ते आणि उपसचिव आहेत ते त्यांना या कार्यातून तात्पुरते कार्यमुक्त केले पाहिजे. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी चौकशी करावी, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

Nilam Gorhe letter
Nilam Gorhe lettersarkarnama

सदर चौकशी करून या महिलेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या दोघांनाही ताबडतोब त्यांच्या जबाबदारीतून बाजूला ठेवल्याशिवाय चौकशी नि:पक्षपाती होणार नाही. अशा प्रकारची वक्तव्य जर मंत्रालयात होत असतील आणि याची पत्रकार परिषद संभाजीनगरला 20 ऑक्टोबरला होऊन सुद्धा इतके दिवस होऊन गेले. मात्र, त्याची कोणीही दखल घेतली जात नसेल, तर अतिशय गंभीर बाब आहे.

Crimw News Mumbai
Chhagan Bhujbal : सुरक्षा काढणे योग्य नाही, सरकारने पुनर्विचार करावा : भुजबळांची मागणी!

म्हणून सरकारने प्रकरणामध्ये ताबडतोब लक्ष घालावे, अशा प्रकारचे निर्देश गोऱ्हे दिले आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी यासाठी निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in