Shinde vs Thackeray : लेखी युक्तीवाद करण्यास सोमवारपर्यंत मुदत; पुढील सुनावणी ३० जानेवारीला

Shinde vs Thackeray : आता लेखी उत्तरं सादर केल्यानंतर अंतिम निकाल येणार?
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav Thackeray Sarkarnama

Shinde vs Thackeray : धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची महत्वाची सुनावणी आज (ता.20 जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पार पडली. या दरम्यान दोन्ही गटाकडून आयोगासमोर जोरदार युक्तीवाद करण्यात आला. तर शिंदे आणि ठाकरे गटाचा युक्तीवाद आजच पूर्ण होण्याची शक्यता होती.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Thackeray Vs Shinde : पक्षप्रमुखपदाला मुदत वाढ द्या; अन्यथा निवडणुकीला परवानगी द्या, ठाकरे गटाची मागणी!

मात्र, आयोगाने आता दोन्ही गटाला लेखी युक्तीवाद सादर करण्यास सोमवारपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे आता लेखी उत्तरं सादर केल्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद होणार की थेट निर्णय येणार हे आता ३० जानेवारीलाच पाहायला मिळणार आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shinde vs Thackeray : निवडणूक आयोगासमोर ठाकरे-शिंदे गटांच्या वकीलांमध्ये शाब्दिक चकमक

शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाणावर कोणाचा हक्क आहे? यावर आजही निकाल येऊ शकला नाही. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर यावर दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे. त्यामुळं यावरचा निकालही लांबला असून धनुष्यबाण चिन्हं कोणाचे याचा पेच अद्यापही कायम आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Thackeray Vs Shinde : प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच : ठाकरे गटाचा युक्तिवाद!

दरम्यान, गेल्या ६ महिन्यांपासून खरी शिवसेना कोणाची आहे? यावर संघर्ष सुरु आहे. पक्षचिन्हाबाबतचा निर्णय घेण्याचे काम सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निवडणूक आयोगाकडे सोपावले. त्यानंतर आता निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी होत आहे. आता पुढची सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in