डोंबिवली : कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये शिवसैनिकांत (ठाकरे गट) खळबळ उडाली आहे.
कल्याण पश्चिमेत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत डी.बी.चौकात रस्ते कॉंक्रीटीकरणचे काम सुरु आहे. हे काम सुरु ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वंडार कारभारी यांनी एक लाखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एन.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक खालीक पाटणकर यांनी याप्रकरणी वंडार कारभारी यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पश्चिमेतील पाईप लाईन रोडवरील डी.बी.चौकात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणचे काम सुरु आहे. एन.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी प्रकल्प व्यवस्थापक पाटणकर, सिव्हिल साईट अभियंता महेश जमाकंडी आणि इतर कामगार हे काम करीत असताना त्या ठिकाणी वंडास कारभारी नावाचे व्यक्ती आले. त्यांनी पाटणकर व इतर कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करत तुमच्या साहेबांना मला एक लाख रुपये द्यायला सांगा, नाही तर तुमचे चालू काम बंद करा.
तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या गाड्या परत पाठवेल, तसेच तुम्हालाही मारुन येथून पळवून लावेल, अशी दमदाटी देखील केली असल्याचे पाटणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
रस्ते कामात अडथळा आणून सरकारी कामात हस्तक्षेप केल्याबद्दल ठेकेदार कंपनीने वंडार कारभारी विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
दरम्यान, वंडार कारभारी यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पक्षाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. राजकीय आकसापोटी कार्यकर्त्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप बासरे यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.