
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची 'लोक माझे सांगाती' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातून पवार यांनी आपली राजकीय जडणघडण कशी झाली? याचा खुलासा केला. या पुस्तकाची सुधारित आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे.
या आवृत्तीमध्ये पवारांनी विविध घटनांचा खुलासा केला. या पुस्तकातून त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या 'पहाटेच्या शपथविधी' वरही भाष्य केले. पवारांची ही राजकीय आत्मकथा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. दुसरीकडे, अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
अजित पवार (Ajit Pawar) आपली आत्मकथा कधी लिहिणार? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर अजित पवारांनी थेट उत्तर दिले. पवार म्हणाले, ''सध्या तरी आत्मकथा लिहिण्याचा काहीही विचार नाही. भविष्यात बघू… मात्र, तुमच्या सूचनांचा आदर करू…'' असे विधान अजित पवारा यांनी केले. त्यामुळे अजित पवारांनी राजकीय आत्मकथा लिहिली तर त्यामध्ये काय गौष्यस्फोट असतील अशी चर्चा रंगली.
दरम्यान, सध्याचे हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून बदल्यांसाठी रेट ठरला आहे, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर केला. तसेच सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासाळली असून एका कार्यकर्त्याने मला दाखविलेला फोटो पाहून धक्काच बसला. मनगट तोडण्याचे काम जर कोण करीत असेल आणि सरकार काय झोपा काढतंय का, असा प्रश्न त्यांनी केला.
आताच्या सरकारचे मंत्री कोणाला विचारात नाहीत, मंत्रिमंडळात बसत नाहीत. काही जणांकडून घाणेरडे शब्द वापरले जातात. हे सर्व पाहून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या डोळ्यात पाणी येत असेल असेही पवारांनी नमूद केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.