शिंदे-फडणवीस सरकारच्या उदासीनतेमुळे प्रकल्प गुजरातमध्ये; मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याची चर्चा

Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama

Eknath Shinde : मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे. पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे उभारण्यात येणारा सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टरचा हा प्रकल्प होता. दोन लाख रोजगार निर्मिती क्षमता असलेल्या या प्रकल्पातून जीएसटीचा २६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. या प्रकल्पावरुन आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प हा महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. महाविकास आघाडीतील तत्कालिन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी या प्रकल्पाबाबत अनेक बैठका घेऊन हा प्रकल्प तळेगाव येथे उभारण्याचे जवळपास निश्चित केले होते. राज्यात सत्तांनंतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचे, सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे किया मोटार कंपनीच्या नंतर दुसरा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून अन्य राज्यात गेला आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
1. 54 लाख कोटींची प्रक्लप गुजरातला; उद्योगमंत्री सामंत म्हणतात माहिती घेतोय

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही 'फॉक्सकॉन' आणि 'वेदांत' या कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. सेमीकंडक्टर व डिस्प्ले फॅब उत्पादन निर्मिती प्रकल्प पुण्यात उभारण्यासंदर्भात ही चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर 'वेदांता'चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागूनही गेल्या पंधरा दिवसांत त्यांना वेळ मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अशी चर्चा अधिकारी वर्गात आहे.

मुळात, तळेगाव येथे प्रकल्प उभारण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या अहवालात स्पष्टही केले होते. प्रकल्प उभारण्यासाठी राज्यात अद्ययावत प्रोग्रेसिव्ह इलेक्ट्रॉनिक पॉलिसी असून प्रोडक्शन इन्सेन्टिव्ह योजनेबरोबर ती जोडण्यात आलेली. तळेगाव येथील औद्योकीकरण विचारात घेता अतिरिक्त लाभ (फायनल ऍडिशनल बेनेफिट) धोरणानुसार जवळपास ४० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक तळेगाव येथे असलेल्या सुमारे १५० कंपन्या येऊ शकणार आहेत, असे महामंडळाने अहवालात म्हटले होते.

ऑटो आणि स्मार्टफोन उद्योगांसह अत्याधुनिक उपकरणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर निर्मितीचा भारतात तुडवडा आहे. त्यामुळे, भारतातच सेमीकंडक्टर उत्पादनासाठी प्रयत्न सुरू होते. 'फॉक्सकॉन' कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांची प्रकल्प गुंतवणूक करण्यासाठी निवड केली होती. त्यातही महाराष्ट्रातील तळेगाव व गुजरात येथील ढोलेरा या ठिकाणांना कंपनीने पसंती दिली होती. 'ॲपल' या जगप्रसिद्ध मोबाईल फोनची निर्मिती करणाऱ्या तैवान येथील 'फॉक्सकॉन' कंपनीने यापूर्वी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आश्वासन देऊन नंतर काढता पाय घेतला होता. त्यानंतर त्याच ‘फॉक्सकॉन’ सोबत ‘वेदांत’ या उद्योग समूहाने भागीदारी करून हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यास सहमती दाखविली होती.

'इंटिग्रेटेड डिस्प्ले अँड सेमी कण्डक्टर फॅब्रिकेशन इकोसिस्टीम' मध्ये राज्यात हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये उभारण्यात येणार होता. एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर व ३८०० कोटी रुपयाचे सेमीकंडक्टर असलेली आणि चाचणी सुविधा असे या प्रकल्पाचे स्वरूप होते. वेदांता कंपनीने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केली होती. या माध्यमातून दक्षिण भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे असेंबली युनिट्स उभारण्याचे काम सुरु आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
एकनाथ शिंदेंचे पुढचे टार्गेट जितेंद्र आव्हाड; नवी मुंबईतील समर्थकांवर टाकले जाळे!

प्रकल्प महत्त्वाचा का होता?

-इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार अशा प्रकारे भांडवली गुंतवणूक केल्यामुळे जीडीपीमध्ये ४० कोटी डॉलर वाढीची शक्यता

- संपूर्ण प्रकल्पामुळे देशांतर्गत मूल्यवर्धन २० ते ७० टक्के एवढी वाढण्याची शक्यता

-डिझाइन्स नाविन्यपूर्णतेमध्ये जागतिक संशोधन व विकासामध्ये महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली असती

- तळेगाव भागामध्ये विशेषतः महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगारक्षम करण्याचे नियोजन होते

- प्रकल्पामुळे महाराष्ट्राची दुसरी सिलिकॉन व्हॅली अशी ओळख झाली असती

- स्थानिक पुरवठा साखळी मजबूत होऊन दीडशेपेक्षा जास्त कंपन्या या गुंतवणुकीचा हिस्सा बनणार होत्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in