Shinde-Fadnavis government : राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 'एवढी' वाढ

Mumbai : अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा
Anganwadi Workers and Eknath Shinde
Anganwadi Workers and Eknath Shinde Sarkarnama

Anganwadi Workers : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान आज सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. तर अंगणवाडी सेविकांनाही दिलासा देण्याचा निर्णय आज सरकारने घेतला.

अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासाठी अनेकवेळा अंगणवाडी सेविकांनी आंदोलनही केले. तर मागील तीन दिवसांपासून राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत.

Anganwadi Workers and Eknath Shinde
Devendra Fadnavis News: फडणवीसांनी मान्य केला विरोधी पक्षनेत्यांचा ‘तो’ मुद्दा, त्यावर बोलतही होते; पण…

या पार्श्वभूमीवरच सरकारने अंगणवाडी सेविकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अजूनही त्यांच्या काही मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.

Anganwadi Workers and Eknath Shinde
Chandrakant Khaire News: खैरे म्हणाले, अहीरांच्या पराभवाला मुनगंटीवार जबाबदार !

दरम्यान, कर्मचारी आणि सरकार यांच्या सहभागाने पेन्शन देखील सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. तसेच मानधन आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणीही अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com