राणा दाम्पत्याला मोठा झटका : तुरुंगातील जेवणचं 'सकस' मानून खावे लागणार...

Navneet Rana | Ravi Rana : राणा दाम्पत्याच्या मागील अडचणींची मालिक अद्याप कायम
राणा दाम्पत्याला मोठा झटका : तुरुंगातील जेवणचं 'सकस' मानून खावे लागणार...
Navneet Rana | Ravi RanaSarkarnama

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यामागील अडचणींची मालिक अद्याप कायम आहे. या दोघांनीही जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. पण यापूर्वी तो फेटाळण्यात आला असून सरकारनेही राजद्रोहाचा आरोप करत त्यांच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. या दोघांच्याही जामिन अर्जावर उद्या (शनिवारी) सुनावणी होणार आहे. अशातच राणा दाम्पत्याला न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे.

मुंबई सत्र न्यायालनाने राणा दाम्पत्याची घरचे जेवण देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. गुरुवारी राणा दाम्पत्याने घरच्या जेवणासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. यात तुरुंग प्रशासनाने 'तुरुंगामध्ये सर्व कैद्यांना सारखा आणि सकस आहार दिला जातो' असे सांगितले. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाचा हा दावा ग्राह्य मानत राणा दाम्पत्याची घरच्या जेवणाची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्या राणा दाम्पत्याला जामिन न मिळाल्यास पुढील आणखी काही दिवस त्यांना तुरुंगातीलच जेवण जेवावे लागणार आहे.

राणां दाम्पत्यावर वर तब्बल २१ गुन्हे

सरकारी वकिल अॅड. प्रदीप घरत यांनी आज सांगितले की, राणा दाम्पत्यानी जामीनासाठी अर्ज केला आहे. पण त्यांच्याविरोधातील कलम गंभीर आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. त्यांना जामीन झाला तर दबाव येऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रवी राणा यांच्याविरोधात १७ आणि नवनीत राणा यांच्याविरोधात ६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे. बोरीवली येथून त्यांनी खोटा शाळेचा दाखला मिळवला होता. हे मुद्दे न्यायालयासमोर मांडून जामीनाला विरोध केला जाणार असल्याचे घरत यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. यादरम्यान शिवसैनिकांनी राणांच्या घरासमोर जावून जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.