Shivendraraje : विधानभवन प्रांगणात मेघडंबरीसह शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले MLA Shivendraraje Bhosale यांनी आज लक्षवेधीतून विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या Chhatrapati Shivaji Maharaj पुतळ्याकडे statue मुख्यमंत्री CM, उपमुख्यमंत्र्यांसह DyCM सदस्यांचे लक्ष वेधले.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosalesarkarnama

मुंबई : साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज सभागृहात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी महाराजांना शोभेल, असा नाही. त्यामुळे तेथे मेघडंबरीसह भव्य असा नवीन पुतळा उभारावा, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज लक्षवेधीतून विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सदस्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्यांचा इतिहास फार मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय...म्हटलं की मराठी माणसाचे रक्त सळसळते, उर भरून येते.

MLA Shivendraraje Bhosale
Satara: पालिकेची निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी.. शिवेंद्रसिंहराजे

तसेच अभिमानाने छाती फुलते. छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. त्याप्रमाणे आपले राज्य चालले पाहिजे. पण, विधानभवनाच्या प्रांगणात जो छत्रपतींचा पुतळा आहे. त्याविषयी सदनातील प्रत्येकाची भावना आहे. हा पुतळा शिवाजी महाराजांना शोभेल, असा नाही. त्यामुळे येथे मेघडंबरीसह इतिहासाप्रमाणे तेथे नवीन भव्य पुतळा बसवावा. मी त्यांच्या घराण्यातील असून तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी भावना मांडली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in