Politics : शिंदे-फडणवीसांना घेरण्यासाठी आघाडीचा खास प्लॅन; उद्धव ठाकरेंसह प्रमुख नेत्यांच्या सात ठिकाणी सभा

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीकडून राज्यातील सात शहरामध्ये विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Mahavikas Aghadi News
Mahavikas Aghadi News Sarkarnama

Mumbai : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. राज्यातील प्रमुख सात शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची विराट सभा होणार आहे. त्यामुळे या सभांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकार आणि राज्य सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे थेट मैदानात उतरणार आहेत. उद्धव ठाकरे यांची कोकणात एक सभा झाली.

त्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची तोफ छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या सात शहरांमध्ये धडाडणार आहे.

Mahavikas Aghadi News
Rohit Patil : "हिमाचलप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरी बसवल्याशिवाय..." ; रोहित पाटलांचे मोठे विधान!

छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला सभा होणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, अंबादास दानवे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून राज्यातील सात शहरामध्ये विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि नागपूर अशा सात शहरांत जाहीर सभा होणार आहे.

त्यामुळे 2 एप्रिलपासून थेट 11 जून पर्यंत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांच्या विरोघात काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahavikas Aghadi News
Devendra Fadanvis: शेतकऱ्यांची नापीक जमीन भाड्याने घेऊन काय करणार? फडणवीसांनी दिलं उत्तर

सभांचं नियोजन कसं असणार?

- 2 - एप्रिल - छत्रपती संभाजीनगर येथे पहिली सभा

- 16 - एप्रिल- नागपूरला दुसरी सभा

- 1 मे - मुंबईत तिसरी सभा होणार

- 14 मे - पुणे येथे चौथी सभा होणार

- 28 मे - कोल्हापूरला पाचवी सभा होणार

- 3 जुन - नाशिकमध्ये सहावी सभा होणार

- 11 जुन - आमरावतीला सातवी सभा होणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com