"मला स्पष्ट बोलायला लावलसं तर तुझी अडचण होईल" : अजितदादा-विश्वजीत कदमांमध्ये जुगलबंदी

Ajit Pawar | Vishwajeet Kadam | Uddhav Thackeray : विश्वजीत कदमांच्या शिक्षणावर अजितदादांचे भाष्य
Ajit Pawar - Vishwajeet Kadam
Ajit Pawar - Vishwajeet KadamSarkarnama

मुंबई : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा काहीसा स्पष्टवक्ता आणि तेवढाच हजरजबाबी स्वभाव महाराष्ट्राला परिचीत आहे. आज मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान अजितदादांच्या याच हजरजबाबी स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा महाराष्ट्राला आला. मुंबईतील मरिन ड्राईव्हजवळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी अत्यंत गंमतीशीर आणि हजरजबाबी पद्धतीने मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwjeet Kadam) यांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली.

अजित पवार बोलताना म्हणाले, आता इथे व्यासपीठावर मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित आहेत. त्यांच्या नावापुढे डॉक्टर लिहिले आहे. पण ते नेमके वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आहेत की संशोधनातले डॉक्टर आहेत हे पटकन समजून येत नाही. पण मी त्यांच्या पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे मला माहित आहे. ते संशोधनातील डॉक्टर आहेत, त्यांनी मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरेट केली आहे. त्यांच्या घराच्याच भारती विद्यापीठामधून ते डॉक्टर झाले.

Ajit Pawar - Vishwajeet Kadam
चंद्रकांतदादांचे आव्हान सतेज पाटील यांनी स्विकारले; बिंदु चौकात येण्यास तयार

अजित पवार हे बोलत असतानाच विश्वजीत कदम यांनी त्यांना मध्येच थांबवून आपण पीएचडी भारती विद्यापीठामधून केली नसून पुणे विद्यापीठामधून केली असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र त्यावर अजितदादा म्हणाले, अरे पीएचडी पुणे विद्यापीठामधून झालीय, पण त्याच्या आधीच शिक्षण तर भारती विद्यापीठामधून झालयं. उगीच काय खरं, तु मला स्पष्ट बोलायला लावलं की तुझी अडचण होईल. यावर पुन्हा विश्वजीत कदम यांनी अजितदादांना थांबवत आपलं एमबीएचे शिक्षण देखील पुणे विद्यापीठातून झाले असल्याचे सांगितले.

Ajit Pawar - Vishwajeet Kadam
राणे भाजपमध्ये दुर्लक्षित? : 'त्या' १२ फायरब्रँड नेत्यांमधून वगळल्याने चर्चांना उधाणं

यावर अजित पवार यांनी व्यासपीठावरुनच विश्वजीत कदम यांची शाळा घेतली. ते म्हणाले, आता तुझ्या नावापुढे डॉक्टर लावलं आहे, आणि डॉक्टर हा इंग्रजी शब्द आहे. आता मराठीचा आग्रह धरायचा तर विद्यावाचस्पती विश्वजीत कदम असं म्हणावं लागेल. पण ते विचीत्र वाटेल त्यामुळे डॉक्टर म्हणून तुला तो शब्द वापरण्यासाठी परवानगी देतो. असे सांगत अजित पवारांनी कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकवला आणि वातावरण हलकं-फुलकं करण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com