Pradeep Kurulkar News: प्रदीप कुरुलकरला जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न; संभाजी ब्रिगेडचा आरोप

Sambhaji Briged on Pradeep Kurulkar: येत्या दहा दिवसात ही कारवाई केली नाही,तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू
Pradeep Kurulkar DRDO
Pradeep Kurulkar DRDO Sarkarnama

Sambhaji Briged on Pradeep Kurulkar : संरक्षण विभागाची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय़एसआयला पुरविल्याच्या आरोपावरून पुण्याच्या डीआरडीओ संस्थेतील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) याला एटीएसने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचीही कारवाई करून हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने पत्रकापरिषेदत शुक्रवारी पिंपरीत केली.

कुरुलकरने देशविघातक, दहशतवादी कृत्य करून देशाचा विश्वासघात केला आहे.पण,तो राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा (आरएसएस) प्रचारक असल्याने तपास यंत्रणा त्याला जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे,असा आरोप ब्रिगेडने केला. तसेच या गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्याच्यावर देशद्रोह आणि दहशतवादी कलमांअंतर्गत कारवाईची गरज आहे. मात्र जाणीवपूर्वक ती करीत नसल्याचा दावा पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश दहिभाते यांनी केला. (Sambhaji Brigade)

येत्या दहा दिवसात ही कारवाई केली नाही,तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करू,असा इशारा त्यांनी दिला. या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Pradeep Kurulkar DRDO
Priyanka Gandhi Will Contest Lok Sabha Elections : प्रियंका गांधी लोकसभा लढणार ? ; काँग्रेसची नवी खेळी, सोनिया गांधींनी सांगितलं..

संशयित आरोपी कुरुलकरने यापूर्वीच वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण आरएसएसशी संबंधित असल्याचे स्वतः सांगितले आहे. त्याबाबतही सखोल तपास करून खुलासा होणे आवश्यक आहे. देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तो होणे आवश्यक आहे. परंतू, पुणे एटीएसने जाणीवपूर्वक या गुन्ह्यात नाममात्र कलमे लावल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्याचा दावा ब्रिगेडने केला. त्यामुळे त्याला लवकर जामीन होईल. ते देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक ठरेल,अशी भीती त्यांनी व्यक्त केली. (Pradeep Kurulkar News)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com