शिवसेना खासदार शेवाळेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

Rahul Shewale|Shivsena|Crime News : खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी एका महिलेने बलात्काराचा आरोप करत लेखी तक्रार केली होती.
Rahul Shewale News in Marathi, Shivsena News
Rahul Shewale News in Marathi, Shivsena Newssarkarnama

Rahul Shewale : शिवसेनचे (Shivsena) नेते आणि खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मुंबईतील अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या निर्देशानंतर साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान संहिता 156 (3) नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (MP Rahul Shewale Latest Marathi News)

Rahul Shewale News in Marathi, Shivsena News
'वेट अ‍ॅन्ड वॉच' राऊताचं नवं टि्वट ; राजभवनातील शिंदे-फडणवीसांचा फोटो शेअर

खासदार शेवाळे यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी एका महिलेने बलात्काराचा आरोप करत याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. यानंतर शेवाळेंनी यासंदर्भात कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हणत 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. त्यानंतर कोर्टाने सुनावणी करत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे, ब्लॅकमेल करणे आदी आरोपाखाली साकीनाका पोलिसांनी ठाण्यात संबधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संबधित महिलेविरोधात साकीनाका पोलीस पुढील तपास करत आहेत.

Rahul Shewale News in Marathi, Shivsena News
अखेर सामंत, देसाईंना आली जाग; 'सरकारनामा'च्या बातमीनंतर ट्विटरवर केला बदल

शेवाळे यांच्याविरोधात एप्रिल महिन्यात या महिलेने आरोप केले होते. त्यावेळी शेवाळेंनी लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावत करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा डागाळण्यासाठी आणि खंडणी वसुलीसाठी हे आरोप करण्यात आल्याचा दावा शेवाळेंनी केला होता.

दरम्यान, याआधीही शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावरदेखील एका युवतीने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. मात्र त्यानंतर या पीडितेने आपल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोप करण्यासाठी दबाव टाकला असल्याचा खळबळजनक दावा केला होता. यावर वाघ यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in