भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; कर्ज बुडवल्याचा आरोप

BJP| Mohit Kamboj| 2011 ते 2015 या कालावधीत कंबोज यांच्या कंपनीनं इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं.
भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; कर्ज बुडवल्याचा आरोप

Case filed against BJP leader Mohit Kamboj

भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक कट रचणे आणि कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंबोज यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

2011 ते 2015 या कालावधीत कंबोज यांच्या कंपनीनं इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं. पण ज्यासाठी ते कर्ज घेतलं होतं, त्यासाठी त्यांचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरली आणि नंतर ते कर्ज बुडवल्याचा आरोप आहे.याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहित कंबोज यांनी ट्वीट करून त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; कर्ज बुडवल्याचा आरोप
रोहित पवारांचे पडळकरांना सडेतोड उत्तर : म्हणाले...

'मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचं मला कळलं. 2017 मध्ये एक जुनी कंपनी बंद झाली. आता त्या कंपनीचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण महाविकास आघाडी सरकार असं करुन माझा आवाज दाबण्याचा किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं अजिबात होणार नाही. हा नवाब मलिकांचा बदला असेल किंवा संजय राऊतांच,पण मी याविरोधात न्यायालयाच कायदेशीर लढेल. आम्ही याला घाबरणार नाही" असं सांगत कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in