राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण अडचणीत; पोलिसांकडून गुन्हा दाखल

भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Vidya Chavan
Vidya Chavansarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्या विरोधात मुंबईतील सांताक्रुज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या तक्रारीनंतर चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vidya Chavan
अमरावतीत राणा दांपत्यास धक्का; नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंबोज यांनी विद्या चव्हणा यांच्याविरोधात तक्रार केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर चव्हाण यांनी मोहित कंबोज आणि भाजपवर टीका केली. ''कंबोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. मोहित कंबोज आता आमच्या विरोधात आरोप करणार का? कंबोज याला कोणी अधिकार दिले? कोण आहे तो, असे तिखट सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केले.

अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अमित शाहांचे जन्मस्थान व भाषेवरून चव्हाण यांनी टीका केली होती. कंबोज यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच चव्हाण यांना जय श्रीराम असे ट्विट केले होते. मात्र, यातून अर्थ स्पष्ट होत नव्हता. आज गुन्हा दाखल झाल्यानंतर कंबोज यांनी दुसरे ट्विट करून 'जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली' असे म्हणत चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.

Vidya Chavan
खासदार श्रीनिवास पाटीलांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी दिल्या सुचना

याबाबत बोलताना चव्हाण म्हणाल्या, कंबोज हे अभ्यास करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. निवडणुकीवेळी मालाड येथे पैशाने भरलेल्या गाडीसह ते सापडेल होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोडून दिले, असा आरोप त्यांनी केला. कंबोज यांचा नातेवाईक ड्रग्ज पेडलर असून नवाब मलिक यांनी त्याचा भांडाफोड केल्यानंतर मलिक यांना जेलमध्ये टाकण्यात आले, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in