सर्वोच्च न्यायालयाने दणका देताच ओबीसींसाठी समर्पित आयोगाचा मोठा निर्णय

OBC Reservation| मागास प्रवर्गाला राजकीय आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला समर्पित आयोगाची निर्मिती करण्याचे निर्देश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने दणका देताच ओबीसींसाठी समर्पित आयोगाचा मोठा निर्णय
OBC Reservation Sarkarnama

OBC Reservation news

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) आदेशानुसार महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) स्थापन केलेल्या समर्पित आयोगाने दौरा जाहीर केला आहे. येत्या 21 मे ते 28 मे २०२२ या कालावधीत समर्पित आयोग पुणे (Pune), औरंगाबाद, नाशिक, कोकण, अमरावती आणि नागपूर मध्ये या भागात दौरा करणार आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी नागरिकांची जनतेची मते, सूचना जाणून घेण्यासाठी आणि या ठिकाणी काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांची निवेदने स्वीकारण्यासाठी आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.

OBC Reservation
राष्ट्रवादी युवकने दिली भाजप विरोधात सायबर सेलमध्ये तक्रार

या दौऱ्यात आयोग विभागीय कार्यांलयांमध्ये नागरिकांची मते जाणून घेणार आहे. नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावीत, यासाठी समर्पित आयोगाच्या दौऱ्या आधीच संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वीच करावी. तसेच यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार यांनी केले आहे.

राज्यातीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास म्हणजेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जातीजमातींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एका समर्पित आयोगाची निर्मिती करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे राज्य सरकारने समर्पित आयोग स्ठापन केला आहे.

असा असेल समर्पित आयोगाचा दौरा

- पुणे: शनिवारी (21 मे) सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

- औरंगाबाद : रविवार (22 मे) सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद

- नाशिक : रविवार (22 मे) सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक

- कोकण : बुधवार (25 मे) दुपारी 2.30 ते दुपारी 4.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन

- अमरावती : शनिवारी (28 मे) सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती

- नागपूर : शनिवारी (28 मे) सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.