तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? बॅनरची जोरदार चर्चा

शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यावरुन शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत.
Uddhav Thackeray, shivsena
Uddhav Thackeray, shivsenasarkarnama

मुंबई : शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यावरुन शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. शिवसेनेची ओळख असणारा दसरा मेळाव्यावर आपला अधिकार सांगत, शिवसेनेचा मेळावा आपणच शिवाजी पार्कवर घेणार असल्याची भूमिका शिंदे गटाने घेतली होती. त्यामुळे शिवाजी पार्कवरील मेळावा कळीचा मुद्दा बनला आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर दसरा मेळाव्यावरुन राजकारण रंगले आहे. शिवाजी पार्कात मेळावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेणार की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार यावरुन वाद सुरु आहे. शिवाय महापालिकेने शिवाजी पार्कवर दोन्ही गटांनाही परवानगी नाकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Uddhav Thackeray, shivsena
दसरा मेळाव्यासंदर्भात संजय राऊतांची शिवसैनिकांना महत्त्वाची सूचना?

आम्ही त्याच मैदानात मेळावा घेणार असल्याचे ठाकरे गटाकडून बोलले जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बॅनरवरती 'आता ताकद दाखवणारच, गद्दारांना शमा नाही! चलो शिवतीर्थ' असे लिहले आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा परवानगीविना शिवाजीपार्कमध्येच होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

बॅनरवर एकीकडे चलो शिवतीर्थ असे लिहिले आहे. त्याच बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचे दुसरे चिरंजीवर तेजस ठाकरे यांचाही फोटो आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात तेजस यांची राजकारणात एट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray, shivsena
Jayant Patil : फडणवीस सोबत नसतील तर मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत कुणी ऐकेल तरी का ?

शिवाय हे पोस्टर सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असले तरी दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत पालिकेकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com