Eknath Shinde : शिंदे सरकारमधील ९३ टक्के आमदार करोडपती ; गुजरातलाही मागे टाकले..

Eknath Shinde : आमदारांच्या संपत्तीत ५ वर्षांत गुजरातमध्ये ४० टक्के वाढ झाली. तर, महाराष्ट्रात अशा आमदारांची संपत्ती ७८ टक्क्यांनी वाढली आहे.
 Eknath Shinde news update
Eknath Shinde news updatesarkarnama

Eknath Shinde : गुजरात विधान सभेची निवडणुक नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजपने गड राखत सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये शिंदे सरकार स्थापन झाले आहे. या राज्यातील आमदारांच्या संपत्तीचे विश्लेषण एका संस्थेने केले आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेने दोन्ही राज्यांच्या निकालानंतर केलेल्या विश्लेषणाच्या तुलनात्मक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदारांच्या संपत्तीत ५ वर्षांत गुजरातमध्ये ४० टक्के वाढ झाली. तर, महाराष्ट्रात अशा आमदारांची संपत्ती ७८ टक्क्यांनी वाढली आहे.

गुजरातमध्ये नवी मंत्रीमंडळाची नुकतीच स्थापना झाली आहे. गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात १६ म्हणजे ९४ टक्के मंत्र्यांची संपत्ती कोटींच्या घरात आहे.गुजरातच्या मंत्र्यांची सरासरी संपत्ती ३२.७० कोटी, तर महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये स्थापन झालेल्या नव्या मंत्रिमंडळातील २० म्हणजे १०० टक्के मंत्री करोडपती आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही ४७.४५ कोटी रुपये इतकी आहे.

 Eknath Shinde news update
Rahul Shewale : राहुल शेवाळेंचा लेटरबाँम्ब : मनिषा कायंदेंकडून ब्लॅकमेलिंग ?

दोन्ही राज्यांतील एकूण आमदारांचा विचार करता गुजरातपेक्षा महाराष्ट्रात १० टक्के अधिक आमदार कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. गुजरातेत ८३ टक्के, तर महाराष्ट्रातील ९३ टक्के आमदार करोडपती आहेत.

  • १८२ विधानसभा सदस्य असलेल्या गुजरातमध्ये १५१ आमदार हे कोट्यधीश आहेत,

  • २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत २६४ आमदार हे करोडपती आहेत.

  • गुजरातच्या आमदारांची सरासरी संपत्ती १६.४१ कोटी आहे.

  • महाराष्ट्राच्या आमदारांची सरासरी संपत्ती ही २२.४२ कोटी इतकी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in