शिवसेनेला धक्का : ज्योती पाटलांसह ५०० महिला कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

ज्योती पाटील आणि समर्थक महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने दिव्यात शिवसेनेला धक्का मानला जात आहे.
Jyoti patil join bjp
Jyoti patil join bjpSarkarnama

दिवा : ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील शिवसेनेच्या (shivsena) ज्योती पाटील यांनी मंगळवारी (ता. ८ मार्च) पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केले आहे. ज्योती पाटील यांनी आपल्या ५०० समर्थक महिला कार्यकर्त्यांसह केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (kapil patil) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. (500 women including Jyoti Patil of Shiv Sena join BJP)

दरम्यान, ज्योती पाटील आणि समर्थक महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने दिव्यात शिवसेनेला धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश भाजपला लाभदायी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Jyoti patil join bjp
ईडीचे ते चार अधिकारी मुंबई पोलिसांच्या रडारवर!

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिवा येथे आज ज्योती पाटील यांनी माझ्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक नेतृत्वावरील हा विश्वास आहे. या वेळी भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार तथा ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे हे उपस्थित होते.

Jyoti patil join bjp
ईडी भाजपचे एटीएम मशिन : संजय राऊतांचा गंभीर आरोप

दरम्यान, शिवसेनेच्या २५ आमदारांना निधी मिळत नाही, या तक्रारींवर मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की, सर्वजण हेच सांगतात की राज्यातील सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस चालवत आहे. सगळं त्यांनाच मिळत आहे. त्या भावनेतून शिवसेनेच्या आमदारांनी निधीबाबत भाष्य केले आहे. हे माझे मत नाही.

Jyoti patil join bjp
खुद्द शरद पवारच म्हणाले,‘इथेही पवारांचेच राज्य दिसतेय!’

दिवा येथे भारतीय जनता पक्षात सुमारे ५०० महिलांनी प्रवेश केल्याने येथील पक्षाची ताकद वाढणार हे निश्चित आहे. या भागात शिवसेनेला खिंडार पाडण्यास भाजपला यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com