धनंजय मुंडेंना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रेणू शर्माला अटक

मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?
 dhananjay munde, Renu Sharma
dhananjay munde, Renu Sharmasarkarnama

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्याविरोधात बलाकाराची तक्रार करण्याची धमकी देऊन ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा (Renu Sharma) हीला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने तिला आज अटक केली आहे. न्यायालयाने रेणू शर्माला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

धनंजय मुंडे यांनी या महिलेची मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपण या महिलेला ओळखत असल्याचे धनजंय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता,''असे धनजंय मुंडे यांनी म्हटले आहे. त्यानंतर या महिलेने बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी मुंडेंनी दिली होती.

रेणू शर्मा हीने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसातच तिने ही तक्रार मागे घेतली होती.तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून मुंडेंकडून पैश्यांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसाना दिले आहे.

 dhananjay munde, Renu Sharma
मोठी बातमी : धनंजय मुंडेंना महिलेची धमकी ; बलात्काराची तक्रार दाखल करणार

''पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?''अशा आशयाचे मेसेज तिनं मुंडेंना पाठविला होता. याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 dhananjay munde, Renu Sharma
पोलीस बदल्यांवरुन शिवसेनेचे नाराजी नाट्य ; पदोन्नती थांबवण्याची गृहखात्यावर नामुष्की

रेणू शर्मा ही मूळ इंदौर( मध्यप्रदेश) येथील असून करुणा शर्मा यांची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी (ता.२०) इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर आज (ता.21) तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रेणु शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. शर्मा यांनी मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पत्रकार परिषदेत करुणा शर्मा यांनी मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. पण, मुंडे यांनी वेळीच स्पष्टीकरण देत त्या माझ्या पत्नी असल्याचं सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com