HM Amit Shah Latest Marathi News
HM Amit Shah Latest Marathi News Sarkarnama

ठाकरेंना फोन करणारे अमित शहा आता मुख्यमंत्र्यांना फोन कधी करणार ? ; सावतांचा खोचक सवाल

Sachin Sawant : भाजप हे फालतू आणि क्षुद्र राजकारणाचे दुसरे नाव आहे,"

पुणे : चार साधूंना बेदम मारहाण (Sadhus Beaten Up in Sangli) करण्यात आल्याची घटना नुकतीच सांगलीत घडली. जत (Jath) तालुक्यातील लवंगा (Lavanga) गावात ही घटना घडली. सर्व साधू उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मथुरा (Mathura)येथील होते. यावरुन राज्यात राजकारणात पेटले आहे. मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवेतून या सांधूना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्या दावे-प्रतिवादे करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याप्रकरणी भाजपला खोचक प्रश्न विचारला आहे. त्यांनी टि्वट करीत भाजपवर टीका केली आहे. साधू मारहाण घटनेप्रकरणी सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले.

पालघरच्या घटनेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंना फोन करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन कधी करणार? असा खोचक सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत म्हणाले, "पालघर मॉब लिंचिंगची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी जनआक्रोश यात्रा काढणारे आता सांगलीतील साधूंवर झालेल्या हल्ल्यांवर गप्प बसले आहेत. भाजप हे फालतू आणि क्षुद्र राजकारणाचे दुसरे नाव आहे,"

 HM Amit Shah Latest Marathi News
Bacchu Kadu : राजकीय आंदोलन भोवलं : बच्चू कडू यांचा मुक्काम आता कारागृहात

"पालघर साधू हत्याकांडात भाजपाच्या सत्तेतील गावातील भाजपा पदाधिकारी होते. मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवेतून हत्या होती. असे असतानाही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपने मविआची हिंदू विरोधी म्हणून बदनामी केली. त्याच अफवेतून जतमध्ये साधूंना मारहाण झाली आहे. आता सरकार कोणाचे? सीबीआयकडे केस देणार का? असा सवाल सावंत यांनी शिंदे सरकारला केला. भाजपच्या दूटप्पी राजकारणाचा आम्ही निषेध नोंदवतो, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

मोदींना गुजरात प्रेम कमी करायला सांगा..

उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही सचिन सावंत यांनी खडेबोल सुनावले आहे. "उद्योगमंत्री जी, फॉक्सकॉनपेक्षा मोठ्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राला मोदीजींच्या कृपेची आवश्यकता नाही. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात कायम नं १ राहिला आहे तो स्वकर्तृत्वावर! मोदींना गुजरात प्रेम कमी करायला सांगा फक्त! गेले दोन महिने उद्योगांच्या जागा वाटपावर स्थगिती ठेवली आहे ते पहा,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com