गणपती बाप्पा शेतकऱ्यांना पावला ! ; शिंदे सरकारकडून पूर बाधितांसाठी भरपाईची घोषणा

maharashtra government : मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.
maharashtra government  compensation of farmers
maharashtra government compensation of farmerssarkarnama

मुंबई : अतिवृष्टीच्या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. अनेक दिवस उलटूनही सरकारकडून (maharashtra government) कसलीच मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये (farmers) चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यात शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे.

जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने गुरुवारी केली. त्यानुसार या मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.

अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावल्याचेच म्हणाले लागेल. कारण राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त 19 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

maharashtra government  compensation of farmers
Raj Thackeray यांची महाराणींच्या निधनावर पोस्ट:..काटेरी राजमुकुट उतरला !

राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई

जालना जिल्ह्यातील 2,311.79 या बाधित क्षेत्रासाठी 3 कोटी 71,84,000 ची नुकसान भरपाई जाहीर केली आहे, त्याचप्रमाणे परभणीतील 1,179 बाधित क्षेत्रासाठी 1 कोटी 60,34,000, हिंगोलीतील 1,13,620 बाधित क्षेत्रासाठी 157 कोटी 4,52,000, नांदेड 5,27,491 बाधित क्षेत्रासाठी 717 कोटी 88,92,000, लातूरमधील 27.425 बाधित क्षेत्रासाठी 37 कोटी 30,83 आणि उस्मानाबादमधील 66,723 बाधित क्षेत्रासाठी 90 कोटी 74,36,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

यात मराठवाडा विभागाला 1 हजार 8 कोटींची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत या नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

अशी मिळणार मदत

शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा निधी सबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच द्यावी, तसेच राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे मंडळामध्ये २४ तासांत ६५ मीलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असल्यास आणि मंडळातील गावामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक शेतपिकांचे नुकसान झाले असल्यास मदत द्यावी, तसेच ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com