प्रकाश आंबेडकरांना धक्का; 23 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल.
प्रकाश आंबेडकरांना धक्का; 23 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
corporators join NCPsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंग जोरात आहे. त्यातच आज (ता. २) वाशिम जिल्ह्यातील अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत २३ नगरसेवकांनी 'घड्याळ' हाती बांधले. २३ नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला आहे.

corporators join NCP
अजित दादांनी शब्द पाळला, संसदेत गाजले विदर्भातील कापूस सोयाबीन…

हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने हाजी मो. युसुफ पुंजानी यांच्यासह हेमेंद्र ठाकरे, जुम्मा पप्पुवाले, फिरोज शेकुवाले, चांदशा कासमशा, अ.एजाज अ. मन्नान, जावेदोद्दीन शेख, इरफानखान इनायतुल्लाखान, जाकीर शेख मो. इसहाक, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, सलीम शेख लालू गारवे, अ. रशीद अ. कदीर, जाकीर अली अब्बासअली, अ.आरीफ अ. वारिस मौलाना, सै. मुजाहीद सै. अजीज, निसारखान नजीरखान डॉ. धनंजय राठोड, मो. फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके, मो. सोहेल अंसारी, अ. बशीर रहीम, शेषराव राठोड या भारिपमधील २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांचा प्रवेश केला.

या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार डॉ. किरण लहामटे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस नसिम सिद्दीकी तसेच पक्षाचे इतर स्थानिक पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचे कुटुंब आहे. या‌‌ कुटुंबात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले प्रश्न इथे नक्कीच‌ सुटतील. कार्यकर्त्यांची गुज राखणारा हा पक्ष आहे. काही दिवसांनी राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून पक्षनोंदणीचा कार्यक्रम जोरात राबवा, असे आवाहन त्यांनी केले.

corporators join NCP
राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात; ठाण्यातील बड्या नेत्याने बांधले घड्याळ

अजित पवार म्हणाले, पक्ष बळकटीसाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करावे. पवार साहेबांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपुढे पोहचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in