Missing Girls in Maharashtra: राज्यातून एकाच महिन्यात २२०० मुली बेपत्ता: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणतात...

मुली, महिलांचं बेपत्ता होण्याची कारणमीमांसा करण अत्यंत गरजेचं
Missing Girls in Maharashtra
Missing Girls in MaharashtraSarkarnama

Missing Girls in Maharashtra : महाराष्ट्रात शेकडो मुली बेपत्ता होत असल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. १८ ते २५ या वयोगटातील ७० मुली दररोज बेपत्ता होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मार्च महिन्यात तब्बल २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. पुणे,नाशिक, मुंबई, ठाणे या भागातून सर्वाधिक मुली बेपत्ता होत आहेत.फेब्रुवारी महिन्याच्या आकडेवारीपेक्षा मार्च महिन्यातील आकडेवारी ही ३०७ जे अधिक असल्याचंही आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. झी २४ तास' या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (2200 girls missing from the state in a single month)

या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आम्ही गेल्या १६ महिन्यांपासून मुंबईतील हरवलेल्या व्यक्तींचा विभागाशी संपर्क साधून बेपत्ता महिलांची संख्या मागवून घेत असतो. त्याच्यावर संबंधित विभागाने काय कारवाई केली, याचाही अहवाल मागवून घेत असतो. सातत्याने आम्ही पाठपुरावाही करत आहोत.

Missing Girls in Maharashtra
Supreme Court News : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा संपणार... 'या' तारखा महत्त्वाच्या...

यासाठी आम्ही विभागवार आणि अँटी ह्युमन ट्रॅफेकिंगच्या माध्यमातून जनजागृती मोहिमही राबवत आहोत. नागपूर येथे नुकताच राज्य महिला आयोगाचा हा कार्यक्रम पार पडला. सातत्याने हरवलेल्या मुलींच्या संदर्भात प्रत्येक पोलीस स्टेशनमधील बुकींग सेल कडेही पाठपुरावा केला जातो. ही आकडेवारी अत्यंत गंभीर आहे. राज्याच्या गृहविभागाने यात लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात मुली, महिलांचं बेपत्ता होण्याची कारणमीमांसा करण अत्यंत गरजेचं आहे. असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. (Maharashtra Politics)

तसेच, या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना मुली महिलांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्येही जनजागृतीपर उपक्रम राबवावेत आणि राज्य शासनानेही त्वरीत हेल्पलाईन क्रमांक सुरु करावेत. जेणेकरुन पालकानी तक्रारी कुठे कराव्यात आणि त्याचा पाठपुरावा कसा करावा, याची माहिती मिळेल.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com