शिवसेनेची गळती थांबेना; शिंदे गटात आणखी २० नगरसेवक

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) २० माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे
Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News, Shivsena Political Crisis
Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News, Shivsena Political Crisissarkarnama

अंबरनाथ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या (ShivSena) आमदार आणि माजी नगरसेवकांचा (Corporator) पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. अंबरनाथमध्येही शिवसेनेच्या सुमारे २०  माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याचा दावा केल्याने पक्षाला जबरदस्त हादरा बसला आहे.(Shivsena Latest Marathi News)

Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News, Shivsena Political Crisis
बंडखोर आमदारांच्या घोळक्यातून दोन आमदार कसे सटकले : अब्दुल सत्तारांनी सांगितला किस्सा

ठाणे येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची आमदार डॉ. बालाजी किणीकर, उप शहरप्रमुख परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी अंबरनाथचे दोन माजी उप नगराध्यक्ष याशिवाय नगरसेवक, नगरसेविकांनी तसेच दोन स्वीकृत नगरसेवकांसह, दोन उपशहरप्रमुख आदींनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News, Shivsena Political Crisis
केसरकर तब्बल महिन्याभरानंतर मतदारसंघात परतणार; शिवसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष

अंबरनाथमध्ये एकून ५७ नगरसेवक असून दोन अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेचे  २५ संख्याबळ होते, त्यातील सुमारे  १९ ते २० नगरसेवकांसह भाजपमधून (BJP) शिवसेनेत आलेल्या माजी दोन नगरसेवकांनी आणि शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे शहरात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. १७ मे २०२० रोजी नगरपालिकेची मुदत संपली होती. १९ मे  २०२० पासून नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेतील घडामोडींबाबत योग्य वेळ आल्यावर भूमिका स्पष्ट करू असे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com