योद्ध्यांनाच कोरोनाचा विळखा: मुंबई पोलीस दलात १८ अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह

गेल्या 48 तासांत मुबंई पोलिस (Mumbai Police) दलातील 114 पोलीस कर्मचारी पॉझिटीव्ह
mumbai police
mumbai police

मुंबई : राज्यात कोरोना (Corona virus) रुग्णांची सातत्याने वाढ होत असताना नेते मंडळींमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशातच आता कोरोना योद्ध्यांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. मुंबईकरांसाठी २४ तास सेवेत असणाऱ्या मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील 18 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

यात 13 पोलीस उपायुक्त, 4 अप्पर पोलीस आयुक्त आणि एक सह आयुक्त अधिकारी यांचा समावेश आहे. तर पोलिस दलात मागच्या 48 तासांत 114 पोलिसांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असून 2 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 125 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अद्यापही 523 अॅक्टिव रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत.

mumbai police
प्रांताधिकाऱ्यांनी केलं अर्धेगाव जमीनदोस्त

विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre patil) सह पोलिस आयुक्त ( जॉइंट सीपी ), संदीप कार्णिक, सत्यनारायण चौधरी, अतुल पाटील, दिलीप सावंत अतिरिक्त पोलिस आयुक्त ( अडिशनल सीपी ) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, एन . हरीबालाजी, सोमनाथ घारगे, दत्ता नलावडे, गीता चौहान, प्रकाश जाधव, नितिन पवार, विशाल ठाकूर, नियती ठाकर, सुनील भारद्वाज, एन. अम्बिका, बालकृष्ण यादव, विजय पाटील, मंजूनाथ सिंगे या पोलिस उपायुक्तांनाही ( डिसीपी) कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, गेल्या 48 तासांत मुबंई पोलिस दलातील 114 पोलीस कर्मचाऱ्यांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण 125 पोलिस कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com