Nana Patole : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात 16 आमदार बाद होणार ; नाना पटोलेंचा दावा

Maharashtra News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nana Patole News : सुप्रिम कोर्टाचा निकाल हा शेड्युल 10 प्रमाणे येण्याची शक्यता आहे, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Nana Patole
Supreme Court News : सत्तासंघर्षाच्या युक्तीवादादरम्यान सरन्यायाधीशांनी केलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणी; निकालावर परिणाम होणार?

ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात हे प्रकरण होते, त्यावेळचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्या वकीलालाही सुप्रिम कोर्टात पाठविले होते. त्यांच्या वकिलांनी अॅफिडेव्हिट करुन दिले होते की सुप्रिम कोर्टाने याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे आता सुप्रिम कोर्टात हा चेंडू असून तो निकाल उद्या (11 मे) ला येणार आहे. शेड्यूल 10 प्रमाणे हा निकाल आला तर सर्व लोक अपात्र होतील आणि सरकार पडेल, असे नाना पटोले यांनी म्हणाले.

Nana Patole
Abdul Sattar On Court Decision : उद्याचा निकाल विरोधात गेला तरी स्वागत करू, सत्तार हे काय बोलून गेले..

द केरला चित्रपटावरून भाजपवर टीका...

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द केरळा स्टोरी' चित्रपटाला एकीकडे चांगला प्रतिसाद मिळतोय तर दुसरीकडे या चित्रपटावरून राज्यकर्त्यांनमध्ये आरोप प्रत्योआरोप सुरू आहेत. याविषयी पटोले म्हणाले, "हे प्रकरण कोर्टात गेले होतं. चित्रपटाच्या निर्मात्याने कोर्टात सांगितले की हे काल्पनिक आहे, हे वस्तू स्थितीवर आधारित नाही. पण भाजप या सगळ्या गोष्टी वास्तविक दाखवून सामाजिक आणि धार्मिक वाद निर्माण करण्याचे काम करत आहे.

काश्मिर फाईलमध्ये देखील भाजपने हाच प्रयत्न केला होता. महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक राज्यांमध्ये तिथे भाजपची सत्ता आहे, त्यांनी तिकडे तिकीटे काढून गर्दी केली. मात्र लोक सिनेमा बघायला गेले नाहीत आणि चित्रपटाला मोठी गर्दी होते असे भासवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा सवाल आहे. काश्मिर मध्ये रोज काश्मिरी पंडितांचा खून होत आहे. तेथे पंडित असुरक्षित आहेत. अशावेळी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाहीत ? असा सवाल देखील यावेळी पटोले यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com