कोरोना लसीमुळे मुलीच्या मृत्यूची अफवा पसरवणं डॉक्टरला पडले महागात

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याने देशभरात लहान मुलांचे ट्रायल लसीकरणही (Trial vaccination) सुरु झाले आहे
कोरोना लसीमुळे मुलीच्या मृत्यूची अफवा पसरवणं डॉक्टरला पडले महागात

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर राज्यासह देशभरात लहान मुलांचे ट्रायल लसीकरणही सुरु झाले आहे. मात्र कोविड लसीकरणाबाबत (Vaccination) सोशल मिडीयावर अफवा पसरवल्या जात असल्याचं समोर आले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

कोरोना लसीमुळे मुलीच्या मृत्यूची अफवा पसरवणं डॉक्टरला पडले महागात
काँग्रेसचा आमदार घसरला कंगनाच्या गालावर अन् व्हिडीओ झाला व्हायरल!

ट्विटरवर डॉ. तरुण कोठारी (Dr. Tarun Kothari) या एमबीबीएस डॉक्टरने, १८ वर्षांखालील मुलांच्या ट्रायल वॅक्सिनेशन घाटकोपरच्या १५ वर्षीय तरुणीच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर ट्रायल लसीकरणामुळे १५ वर्षीय आर्यबेन गोविंदजीभाई या मुलीचा मृत्यू झाल्याचे पोस्ट करत ट्रायल लस घेऊन मृत्युचे शिकार बनू नका, असे आवाहनही केले आहे.

या ट्विटचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने (BMC) डॉ. तरुण तिवारी यांना त्यांनी शेअर केलेल्या ट्विटसंबंधी सतत्या पडताळणीकरता संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. "सर, आम्ही तुमच्या बायोडेटा पाहिला, ज्यात तुम्ही स्वत: एक एमबीबीएस आहात. आम्ही आशा करतो. तुम्ही शेअर केलेल्या फोटोबाबत आम्हाला योग्य उत्तर देऊ शकता. त्यासाठी आमच्याशी संपर्क करा, आणि या फोटोची सत्यता पडताळून पहा, असे म्हणत मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे डॉ. तरुण तिवारी यांनी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संकटावर मात करण्यासाठी देशात १५ ते १८ वर्षे वयातील मुलांच लसीकरणाला ३ जानेवारीा पासून सुरुवात झाली. भारतातही ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असताना अशा अफवा पसरवल्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरु नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in