Palghar Politics: वृद्ध दाम्पत्याची 15 लाखांची फसवणूक; राजेंद्र गावितांना उच्च न्यायालयाची नोटीस

Rajendra Gavit: रोहिंटन आणि होमाई तारापोरवाला यांच्याकडून गावितांनी निवडणूक लढवण्यासाठी १५ लाखांची मदत मागितली होती
Palghar Politics | Rajendra Gavit
Palghar Politics | Rajendra Gavit Sarkarnama

Palghar Politics : शिंदे गटाचे नेते आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित वादात सापडले आहे. एका वृद्ध दाम्पत्याची फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राजेंद्र गावित यांना नोटीस पाठवली आहे. निवडणुकीसाठी पंधरा लाख रुपये घेतले आणि परत न केल्या प्रकरणी त्यांना ही नोटीस पाठवण्यास आली आहेत. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. रोहिंटन (वय ७६) आणि होमाई (वय ७४) तारापोरवाला असे दाम्पत्याचे नाव आहे. (15 lakh fraud of an elderly couple; High court notice to Shinde faction leader)

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिंटन आणि होमाई तारापोरवाला हे दाम्पत्य पालघरच्या बावडा येथील रहिवासी आहेत. या दाम्पत्याची चिकूची शेती आहे. तर त्यांची दोन मुले परदेशात वास्तव्यास आहेत. २०१९ साली ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र डुबला यांच्यामाध्यमातून राजेंद्र गावित यांनी तारापोरवाला दाम्पत्याकडून निवडणूक लढवण्यासाठी पैशांची मदत मागितली होती. तसेच निवडणुकीनंतर आपण हे पैसे लगेच परत करु, असं आश्वासनही त्यांनी तारापोरवाला यांना दिलं होतं. त्यांच्या आश्वासनानंतर तारापोरवाला दाम्पत्याने गावितांना पंधरा लाख रुपये उसने दिले. त्यावर गावितांनी तारापोरवाला दाम्पत्याला पोस्ट डेटेड चेकही दिला.

Palghar Politics | Rajendra Gavit
Sushma Andhare : श्रीकांत शिंदेंच कार्यालय कोणाच्या जागेत? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना थेट सवाल..

परंतु, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर गावितांनी तारापोरवालांना टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये राजेंद्र गावितांनी दिलेला चेकही बाऊन्स झाला. चेक बाऊन्स झाल्या प्रकरणी तारापोरवाला यांनी गावितांना कायदेशीर नोटीस पाठवली. तेव्हा त्यांनी तारापोरवाला यांना ९ लाख रुपये दिले.पण उर्वरित पैसे देण्यास गावितांनी थेट नकार दिला.

त्यामुळे तारापोरवाला दाम्पत्याने जून २०२१ मध्ये पुन्हा वणगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.पण ऑगस्टमध्ये हा नागरी वाद असल्याचे सांगून गावितांविरोधाील फौजदारी गुन्हा रद्द करण्यात आला. त्यानंतर तारापोरवाला दाम्पत्याने डहाणूच्या पोलीस अधीक्षकांनाही पत्राद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पण अवैध पद्धतीने कर्जवाटप केल्या प्रकरणी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. सप्टेंबर २०२१ मध्ये तारापोरवाला यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू, सोने आणि कागदपत्रं जप्त करण्यात आली.

जयेंद्र डुबला यांनीच तारापोरवाला दाम्पत्याविरोधात व्याजाने कर्ज दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तारापोरवाला दाम्पत्यावर आरोपपत्रही दाखल झाले. तरीही त्यांनी कोणालाही न जुमानता आपल्या तक्रारी चालूच ठेवल्या. स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्य यंत्रणा सहकार्य करत नसल्याचा आरोप करत आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी तारापोरवाला दाम्पत्याने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने आता राजेंद्र गावितांना नोटीस धाडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com